कारंजा (लाड)- महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील प्रत्येक महिलांशी लाडक्या बहिणीचे नाते लावून त्यांचे राहणीमान उंचावण्याच्या दृष्टिने आणि त्यांच्याही हातात स्वखर्चाकरीता पैसा मिळावा म्हणून,लाडक्या बहिनींना दरमहा दिड हजार रुपये देणारी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरु केली.परंतु काही बँका मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा निधी परस्पर कर्ज रकमेत कपात करीत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते महादेव ठोंबरे यांचे नजरेस येवून त्यांनी सदर प्रकरणाची तक्रार आदर्श समाजसेवक संजय कडोळे यांचेकडे केली.त्यामुळे आदर्श समाजसेवक संजय कडोळे यांनी सांगीतले की,राज्याच्या महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासनाचे सचिव डॉ अनुपकुमार यादव यांनी आदेश - पत्र क्रंमबावि 2024/प्रक्रं 96 (भाग-2) का-2 दिनांक : 19 ऑगष्ट 2024 या शासकिय आदेशाद्वारे,लाडकी बहीण योजनेची रक्कम कोणत्याही प्रकारच्या त्यांच्या प्रलंबित असलेल्या कर्ज वसूलीसाठी बँकेकडून कपात करू नये.किंवा सदर रक्कम लाभार्थी बहीनींना देण्यास संबधीत बँकानी विलंब वा टाळाटाळ करू नये.तसेच काही लाभार्थ्याकडे बँकेचे प्रलंबित असलेल्या कर्जाची परतफेड न केल्यामुळे बँक खाते गोठविण्यात आले असल्यास सदर बँक खाते तात्काळ सुरु करण्यात यावे.व या योजनेतंर्गत लाभार्थ्यांना प्राप्त होणारी लाभाची रक्कम लाभार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात यावी.अशा सुचना शासनातर्फे स्पष्टपणे लेखी स्वरूपात देण्यात आल्या आहेत.तरी सर्वच बँकांनी सदर योजनेचे पैसे लाभार्थ्याच्या कर्ज खात्यात किंवा थकीत खात्यात न वळविता, प्रत्येक पात्र लाडक्या बहिनींना ही रक्कम अदा करावी.कारंजा-मानोरा मतदार संघातील कोणत्याही बँकेने लाडकी बाहिन योजनेची रक्कम देण्यास टाळाटाळ केल्याची वा लाभार्थी बहिनींना त्रास दिल्याची तक्रार मिळाल्यास सदर बँकेविरुद्ध तिव्र आंदोलन करण्याचा इशारा,महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त आदर्श समाजसेवक संजय कडोळे यांनी दिला आहे.