वाशिम : आज दि. ११ नोहेंबर,शुक्रवारला राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग मुंबईचे अध्यक्ष व सर्व सदस्य वाशिम जिल्हा येथे आले असता अनुसूचित जाती जमातीच्या विविध सामाजिक संघटनाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तसेच सर्व सामान्य जनेसह तृतीयपंथी व्यक्तिंनी देखील आपणास व आपल्या समाजाला काही न्याय मिळेल हि भाबडी आशा घेऊन फुल हार, गुच्छ व निवेदन देण्यासाठी शासकीय विश्रामगृह वाशिम येथे मोठ्या प्रमाणात जनता उपस्थित होती. मागिल दोन वेळा आयोगाचा नियोजीत दौरा ऐनवेळी रद्द झाला. या वेळी म्हणजे आज शुक्रवारला राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग वाशिमला आला खरा परंतु निवडून आचारसंहितेचे कारण देत ना कुणाशी त्यांनी चर्चा केली. ना कुणाला चर्चा करू दिली .करू दिली. ना फोटो घेऊ दिले ना निवेदनावर वाचन करू दिले. ना कोणत्याही प्रकारची अधिकारी यांना निर्देश दिले. हिच परिस्थिती निर्माण झाली तर अनुसूचित जाती जमातीच्या सामाजिक हिताचे प्रश्न नेमके मांडायचे तरी कुणासमोर ? ज्या धोरणात्मक बाबीसाठी सरकारला सल्ला व निर्देश देण्यासाठी आयोग स्थापन करण्यासाठी संविधानात तरतूद करण्यात आली आहे, तो आयोग जर बोटचेपी भुमिका घेत असेल तर अनुसूचित जाती जमातीच्या विकासाचा मुद्दा काय असेल हे न सांगितलेले बरे. आचारसंहिता आहे हे माहीत असूनही आयोग नेमका आलाच तर कशासाठी यांची चर्चा जनमानसात होतांना दिसत आहे.
महामानव विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नातून १५ आक्टोबर १९३२रोजी सामाजिक न्याय विभागाची स्थापना झाली या घटनेला नव्वद वर्षे पूर्ण झाली आहेत व देश स्वातंत्र्याचे पंचाहत्तर वर्षे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करत आहे.
परंतु आजही अनुसूचित जाती जमाती च्या लोकांचे शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनमान सुधारले नाही. भारतीय संविधानासमोर सर्व समान आहेत, लिंग, भाषा, प्रांत व जातीच्या आधारावर भेदभाव करता येणार नाही हे भारतीय संविधान ग्वाही देते परंतु सामाजिक वास्तवात मात्र खुप भेदभाव केला जात आहे, शासन गांभीर्याने घेत नाही म्हणून आयोग या नात्याने शासनास धोरणात्मक बाबी लक्षात आणुन त्यांची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी आता गा-हाणी तरी घेऊन जायचे कुणाकडे हा मोठा प्रश्न अनुसूचित जाती जमाती समोर निर्माण झाला आहे. असी परखड तक्रार नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिसचे राज्य सहसचिव पूर्णाजी एस खंदारे यांनी महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांचेकडे केली आहे .