अकोला : व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगचे विदर्भ अध्यक्ष शंकर जोगी यांचा आज अकोला येथे सत्कार करण्यात आला. यावेळी व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगचे प्रदेशाध्यक्ष विनोद बोरे, अकोला जिल्हाध्यक्ष पंजाबराव वर, राज्य कोषाध्यक्ष संदीप देशमुख, विदर्भ उपाध्यक्ष गोपाल दांदळे यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सीमा तायडे, ज्येष्ठ साहित्यिका विद्याताई बनाफर आदी मान्यवर उपस्थित होते.