वाशिम : महाराष्ट्र शासनाचा,समाजसेवकांना दिल्या जाणारा डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण हा सर्वोच्च पुरस्कार मिळाल्याबद्दल दिनेशबाबू वाघमारे यांचा महाराष्ट्रातील नामांकित असलेल्या विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाच्या वतीने,आमदार विकासभाऊ ठाकरे,आमदार संजय मेश्राम,पदवीधर आमदार अभिजीत वंजारी,राधिकादेवी चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक गिरीष पांडव यांचे प्रमुख उपस्थितीत,अध्यक्ष संजय कडोळे,वैदर्भिय नाथ समाज संघाचे अध्यक्ष एकनाथ पवार, महाराष्ट्रातील नामांकित असलेले हास्य कलाकार अ.भा.मराठी नाट्य परिषद शाखा कारंजाचे संस्थापक सदस्य तथा विदर्भ लोककलावंत संघटनेचे ज्येष्ठ सल्लागार शाहीर देवमन गणूजी मोरे,गजाननराव चव्हाण,युवा पत्रकार फुलचंद भगत,सौ. अर्चना वाढणकर, हभप. शिलाताई चिवरकर यांच्या शुभ हस्ते शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देवून नागपूर येथील मदत राज्यस्तरिय सामाजिक कार्यकर्ता संमेलनात जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.उल्लेखनिय म्हणजे दिनेशबाबू वाघमारे यांनी बालपणापासूनच राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज,कर्मयोगी संत गाडगेबाबा,महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीचा पुरस्कार करून,अहोरात्र महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात जाऊन तळागाळातील बहुजन समाजाची तन मन धनाने मदत केलेली आहे.तसेच आंबेडकरी चळवळीच्या प्रचार प्रसाराकरीता सकल आयुष्य वेचलेले आहे.त्यामुळे नुकतेच काही वर्षापूर्वी त्यांच्या एकसष्ठी निमित्ताने विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी त्यांची जीवनगाथा आपल्या लेखनीने आपल्या लेखामधून मांडली असता संपूर्ण महाराष्ट्र भरातून दिनेशबाबू वाघमारे यांच्या चरित्रपर, साहित्यीक संजय कडोळे यांनी लिहिलेल्या लेखाला भरभरून प्रतिसाद मिळून दिनेशबाबू वाघमारे यांचा गुणगौरव झाला होता.नुकत्याच 2024 मध्ये झालेल्या महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कार समारंभामध्ये तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या हस्ते दिनेशबाबू वाघमारे यांना नागपूर विभागामधून शासनाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण ( दलितमित्र ) पुरस्कार देण्यात आला.त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.त्यांच्या आंबेडकरी चळवळीच्या महत्तम कार्याचा आणि सेवाभावी कार्याचा गौरव म्हणून विदर्भ लोककलावंत संघटनां कारंजा कडून पुनश्च त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.असे वृत्त युवा पत्रकार फुलचंद भगत यांनी कळवीले आहे.