: अल्पवयीन मुलीला घरात बोलावून तिच्याशी अश्लिल चाळे करुन विनयभंग करणाऱ्या संगीत शिक्षक शैलेंद्र खुशाल थुल (रा. गोंडप्लॉट केजाजी चौक, वर्धा) याला बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार न्यायालयाने पाच वर्षे सश्रम कारवास तसेच सात हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.व्ही. आदोने यांनी ही शिक्षा ठाेठावली आहे.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार आराेपी शेैलेंद्र थुल हा संगीत शिक्षक असून तो किरायाच्या खोलीत संगीताचे वर्ग घेण्याचे काम करीत होता. १३ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास पीडिता ही डायपर आणण्यासाठी दुकानात गेली होती. काही वेळाने पीडिता ही रडत रडत घरी आली.
तिने आरोपी शैलेंद्र थुल याने शिकवणी वर्गात बोलावून अश्लिल चाळे करीत विनयभंग केल्याचे तिच्या आईला सांगितले. त्यानंतर आईने पीडितेसह पाेलिस ठाण्यात येऊन तक्रार दिली. या तक्रारीवरुन थूल याच्या गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक प्रिती आडे यांनी करुन आरोपीविरुद्ध सबळ पुरावा उपलब्ध केला. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील प्रसाद पी. सोईतकर यांनी कामकाज पाहिले.
पैरवी अधिकारी सुजीत पांडव, देवेंद्र कडू, यांनी साक्षीदारांना न्यायालयात हजर केले. शासनातर्फे एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. पीडितेची साक्ष व इतर सर्व साक्षीदारांसह जिल्हा सरकारी वकील गिरीश व्ही. तकवाले यांनी केलेल्या यशस्वी युक्तीवाद ग्राह्य धरुन दुसरे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. आदोने यांनी आरोपीला पाच वर्षे सश्रम कारवासाची शिक्षा ठोठावली.