आजचा तरुण सुटबुटात, भांगात कंगवा फिरविताना फॕशनच्या दुनियेत रमला आहे. त्याचे चालणे मस्तीने भरलेले दिसून येते. सर्वच तरुण वाईट असतात असे मुळीच नाही. काही काही तरुण वाईट मार्गाने जाताना दिसतात. काही तरुण व्यसनाच्या आहारी जाऊन आई-वडिलांकडे दुर्लक्ष करीत असतात. सहजच त्याला व्यसनी, वाईट मित्र मिळतात. "क्यो इन्सान चलता अकड अकड के । होगा एक दिन जाना घरबार छोडके ।।" पूर्वीच्या काळी तरुणांना इंटरनेट, मोबाईल, मनोरंजनाची साधने नव्हती. आता या साधनामुळे तरुण बिघडल्या गेला आहे. जून्या काळात कॕरिअर करणे आणि कार्यक्षमता या मूल्यांना खूप महत्त्व होते. ४०-५० वर्षापूर्वी मुलांमुलींचे सबंध मर्यादित होते. आता तर शाळा, काॕलेजमध्ये प्रेम प्रकरणे चालू आहेत. गर्लफ्रेंडमुळे मुले बरबाद झाली आहेत.
अरे ! नटखट क्यो चलता है ?
तेरा नाम लिखा जायेगा ।।धृ।।
नटखट चालणे म्हणजे मजाकपूर्ण, खेळकर पध्दतीने चालणे. एखाद्या तरुण अत्यंत आनंदी, उत्साही, धावत्या मस्तीपूर्ण अंदाजात चालतो म्हणजेच नटखट चालणे. या नटखट वागण्यामुळे वाईट काम केल्या जाते. हे वाईट काम तुझ्या नावाशी जोडले जाईल. वाईट कृत्याची नोंद देव ठेवत असतो. देव सर्व काही पाहतो. तो आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्टीची देवाकडे नोंद असते. "पुरी सजा मिलेगी कबतक मजा करेगा । जैसा किया यहाँपर वैसा ही तू भरेगा ।।" आपल्या प्रत्येक कृतीला, बोलण्याला आणि विचाराला देव जाणतो. तोच आपलं केलेलं कर्म लिहून ठेवत असतो.
खून भरा तो क्या होता है, क्यो नही सेवा करता?
बहुबेटी की इज्जत लेने, गल्ली गल्ली फिरता ।।१।।
तरुणपणात तुझं रक्त उसळत नसेल तर काय कामाच? राष्ट्रसंत म्हणतात, "आगे चल नौजवान आगे चल, समय नही रुकनेका ।।" तुझी जवानी मौजमजा करण्यासाठी नाही तर आपल्या मातृभूमीची, समाजाची, आई-वडिलांची सेवा करण्याचे कामी यावी. गोरगरीब, गरजू लोकांना सेवा द्यावी. राष्ट्रसंत म्हणतात, "तूने सेवा ही न किया है, सुंदर दिखता है तो क्या है ।।" सुनो भाईओ ! आप बेटीसे कहते है की कभी घर की इज्जत खराब मत करना, मगर बेटे से ये क्यो नही कहते की कभी किसीके घर की इज्जत से खिलवाड नही करना । ज्या घरात स्त्रीची इज्जत नाही करत तो बाहेरच्या स्त्रीयांची कसा काय मान, इज्जत ठेवील बरे. स्त्रियांची इज्जत घेण्याकरिता गल्लीबोळातून फिरतोस. देव सर्व काही पाहतो आणि तुझे नाव लिहून ठेवतो.
दिनभर झगडा किसीको रगडा, किसीको मारे चांटा ।
काल बली की पुकार आयी, काल गले नही आता ।।२।।
दिवसभर जवानीच्या तोऱ्यात भांडण तंटा करतोस. महिलांवर अत्याचार करतोस. कुणाही सोबत मारामारी करतोस आणि मालमत्तेची नुकसानी करतोस. ही तुझ्या गुंडगिरीची लक्षणे आहेत. भांडण केल्यामुळे तीव्र मतभेद आणि वाद निर्माण होतात. काल बली म्हणजे बळीराजाची पुकार किंवा स्मरण. बलीराजा एक दैत्य राजा होता. तो दान आणि भक्तीसाठी प्रसिद्ध होता. काल म्हणजे वेळ, बली म्हणजे त्याग. वेळेवर केलेले कार्य त्याग आहे. वाईट कर्म, पाप कर्म केले तर ईश्वर सजा देईलच. तुम्हाला न्यायला काळ कधी येईल याचा भरवसा नाही.
सबसे प्रेम करेगा, जबही मित्र बनेगा ।
तुकड्यादास कहे नही, तो फिर चौऱ्याशी छनेगा ।।३।।
सर्वाशी प्रेमाने वागणे म्हणजे आपल्या आजूबाजूच्या लोकांशी, मित्र मैत्रीणीशी, कुटूंबाशी, अनोळखी व्यक्तीशी देखील नम्र आणि प्रेमळपणे वागावे. त्यांचा आदर करणे म्हणजेच भगवंताचा आदर करणे होय. राष्ट्रसंत म्हणतात, "प्रेम भक्तीविण कलियुगात नाही साध्य काही ।" प्रेमभक्तीमुळे मित्र जुळून येतील. प्रेमभक्ती तुझ्या ठायी नसेल तर राष्ट्रसंत म्हणतात, तू चौऱ्याशी लाख फेऱ्याची निवड तू केली असे समज. कुसंग हा चौऱ्याशीचा फेरा आहे. चौऱ्याशी लाख फेरा म्हणजे विविध प्रकारच्या जीवांचे रुप मानले जाते.
बोधः- तुझ्या नटखट वागण्यामुळे स्त्रियांचा सन्मान होत नाही. स्त्री ही संसाराचा कणा, आधारस्तंभ व अविभाज्य घटक आहे. मातेला मातेसमान, मुलीला मुलीसमान, बहिणीला बहिणीसमान, अर्धांगिणीला सहचारिणीसमान वागणूक दिली पाहिजे. समाजातील अत्याचार थांबले पाहिजेत. स्त्री ही अबला नसून सबला आहे. तिला बदनाम केलेस. तिला भोगवस्तू समजून नुसती बाहुली करुन ठेवू नका. अन्याय, अत्याचार विरुद्ध लढणारे मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराजां सारखे बना.
शब्दांकन/लेखक
पुरुषोत्तम बैस्कार, मोझरकर
श्रीगुरुदेव प्रचारक यवतमाळ
फोन- ९९२१७९१६७७
आपल्या प्रतिक्रिया द्या....