वाशिम/अकोला : साप्ताहिक. "कलम की ताकत" व क्राईम 24 अलर्ट न्यूज चैनलचे मुख्य संपादक व महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषद अकोलचे विदर्भ उपाध्यक्ष विजय तेलगोटे अकोट यांची वैदर्भिय नाथ चॅरिटेबल ट्रॅस्टच्या राज्यस्तरीय महाराष्ट्र भुषण पुरस्काराकरिता निवड झालेली असून दि.२३ फेब्रुवारी २०२५ च्या कार्यक्रमात आ. श्रीमती सईताई डहाके यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या शाही पुरस्कार वितरण सोहळ्यात राज्यमंत्री ना. इंद्रनिल नाईक ,विधानपरिषदेच्या आ. भावनाताई गवळी, शिक्षक आमदार अँड किरणराव सरनाईक,वाशिम मंगरुळपीरचे आमदार श्यामभाऊ खोडे, विशेष अतिथी पो.नि. दिनेशचंद्र शुक्ला, विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे अध्यक्ष संजय कडोळे यांचे हस्ते त्यांना महेश भवन कारंजा येथे हा सन्मान प्रदान करण्यात येईल.
उल्लेखनिय म्हणजे विजय तेलगोटे हे अभ्यासू तरुण पत्रकार असून आपल्या लेखनीने त्यांनी कलम की ताकत दाखवून अकोट तालुक्यासह अकोला जिल्हा हादरवून सोडला आहे. भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ व तळागाळातील गोरगरीबाचा कैवार हे त्यांचे ब्रिद असून भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना त्यांनी आपल्या लेखनीद्वारे ताळावर आणले आहे. समाजामध्ये आदर्श समाजसेवी म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्यांची
राज्यस्तरीय महाराष्ट्र भुषण पुरस्काराकरीता पत्रकारीता क्षेत्रामधूनच निवड झालेली असून त्याबद्दल महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषद वाशिम जिल्हाध्यक्ष तथा विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. शिवाय संपूर्ण अकोला वाशिम जिल्ह्यामधून त्यांचेवर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.