ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था दूर करून रस्त्यांची दर्जोन्नती व सुधारणा कामासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत अकोला (पूर्व) मतदार संघातील सुमारे ४३.५० कि.मी. लांबीच्या ८ रस्त्यांचे कामांना शासनाकडून मंजुरी प्राप्त करण्यात भाजपा प्रदेश सरचिटणीस व अकोला पूर्वचे आमदार रणधीर भाऊ सावरकर यांना यश प्राप्त झाले आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांचे आभार खासदार संजय भाऊ धोत्रे व आमदार रणधीर भाऊ सावरकर यांनी व्यक्त करून ग्रामीण विकासाच्या दृष्टीने व ग्राम स्वराज्य योजना प्रत्यक्ष कृतीने करण्यासाठी ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था मजबुतीकरण व विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल मध्ये आर निधी उपलब्ध करून देऊन महाराष्ट्र शासनाने विकास परवाला गती दिली आहे अशीही खासदार संजय भाऊ धोत्रे आमदार रणधीर भाऊ सावरकर यांनी म्हटले आहे
.. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा २ संशोधन व विकास अंतर्गत. रा.मा. ४७ ते ढगा - कवठा - विटाळी - वरुड जऊळका रस्ता ( ८ कि.मी.), रा.मा. २८१ ते नखेगाव - पिलकवाडी रस्ता ( ५ कि.मी) तसेच टाकळी ते हनवाडी रस्ता रा.मा. ( ७ कि.मी.) रस्त्यांना शासन मंजुरी झाली असून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या नियमित रस्ते विकासांतर्गत येवता - कुंभारी - बाभूळगाव - रस्ता ( ६ कि.मी,) रा.मा. ६ ते राजापूर - अन्वी मिर्झापूर ते दहीगाव (गावंडे) रस्ता ( ९ कि.मी), सांगळूद ते अनकवाडी रस्ता ( ३.५ कि.मी), करोडी फाटा ( रमां २८१) ते पानेट रस्ता (ग्रामा ५०) (२ कि.मी) मारोडी ते लाखोंडा रस्ता (ग्रामा १५६) (३ कि.मी) रस्त्यांना मंजुरी प्राप्त असू प्रशासकीय मायाता प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. असेही आमदार सावरकर यांनी माहिती देऊन राज्यात भाजपा व शिवसेना बाळासाहेब यांचे सरकार आल्यानंतर मोठ्या प्रमाणात ग्रामीण विकासाचा मार्ग सुकर झाला आहे असे सांगून शासनाने
अकोला जिल्ह्यातील क्षेत्र खोल काळ्या मातीचे असल्याने रस्ते सतत खराब होतात, ग्रामीण भागातील रस्त्यांची निकड लक्षात घेता मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत अकोला जिल्ह्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या लक्षांक वाढवून देण्यात यावा तसेच संशोधन व विकास कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यासाठी रस्त्यांची वाढीव लांबी मंजूर करावी अशी मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी राज्याचे उप मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस तथा पालक मंत्री अकोला जिल्हा तसेच राज्याच ग्राम विकास मंत्री ना. गिरीश महाजन यांना केली आहे.