अकोला- पत्रकार हक्क,कल्याण योजना आणि अधिस्विकृती,तर विविध्यांवरील नियुक्त्यांपासून तर जाहिरातवितरणांध्ये शासनाकडून होणाऱ्या प्रचंड अन्याया विरूध्द दाद मागण्यासाठी पत्रकारांनी सर्व प्रकारचे भेदभाव विसरून प्रबळ शक्तीने संघटीत झाले पाहिजे.त्यासाठी कर्तृत्वाला प्रामाणिक उद्देशांनी आणि कृतिशील वाटचालीने पत्रकार हितासाठी सक्रीय असणाऱ्या लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेला मराठवाडा आणि संपूर्ण राज्यात मजबूत करण्यासाठी पत्रकारांनी पुढे यावे.आपल्या विश्वासदर्शक पाठींब्याने विशिष्ट मुल्ल्यांनी काम करणारी संघटना हा इतिहास करण्यासाठी सज्ज व्हावे. असे आवाहन लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष - संजय एम.देशमुख यांनी परभणी येथे केले. आमदार राहूल व माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील यांनी सुध्दा पत्रकारांच्या अडचणींवर भाष्य करून त्या सोडवण्यासाठी सहकार्याचे अभिवचन दिले.

याप्रसंगी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार,प्रदिप खाडे,केंद्रीय मार्गदर्शक व साहित्य संस्कृती मंडळ सदस्य पुष्पराज गावंडे,ज्येष्ठ मार्गदर्शक के.व्ही.देशमुख,लोकस्वातंत्र्य सामाजिक सेवा संघाचे अकोला जिल्हाध्यक्ष संजय कृ.देशमुख प्रमुख अतिथी म्हणून उपस्थात होते.

परभणी शहरातील हॉटेल सिटी पॅलेस येथे दिनांक १५ ऑगस्ट रोजी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा परभणी जिल्हा पत्रकारांचा,पदाधिकारी पदग्रहण, मार्गदर्शन आणि सभासद नियुक्तीपत्र वितरण तथा सन्मान समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय देशमुख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या कार्यक्रमाला परभणीचे माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, आमदार डॉ. राहुल पाटील, लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राज्य संघटक तथा संपर्क प्रसिध्दी प्रमुख भगीरथ बद्दर, महिला राज्य संघटक तथा संपर्क प्रसिध्दी प्रमुख अनिताताई सरोदे, श्री अच्युताश्रम स्वामी महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी मराठवाडा विभागीय संघटन तथा संपर्क प्रतीक देवानंद वाकळे,नांदेड जिल्हाध्यक्ष ईश्वर तलवारे,सुभाष शंकपाळे,नूरूद्दीन सिध्दीकी,इतर पदाधिकारी,परभणी जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर,राहूल गबाळे,प्रमोद अंभोरे व पदाधिकारी आणि पत्रकार उपस्थित होते.
या कार्यक्रमात सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.महापुरूष,क्रांतिकारक,व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगे बाबांना अभिवादन करण्यात आले.त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी मराठवाडा अध्यक्षपदी ॲड. नरसिंग सूर्यवंशी, मराठवाडा डिजिटल मीडिया विभाग अध्यक्षपदी वाजीद खान पठाण, विभागीय कायदेविषयक सल्लागार डिजिटल मीडिया पदी ऍड. रियाज शेख, तसेच गंगाखेड तालुका उपाध्यक्ष पदी पठाण अब्दुल रहमान खान यांना नियुक्ती व ओळखपत्रे प्रदान करण्यात आली.जिल्हा कार्यकारिणीत सदस्य पदी बाळूभाऊ घीके, राजू कर्डिले, अमर गालफाळे, राहुल वाहिवाल, संजय घनसावंत आदिंसमवेत अनेकांची नियुक्ती करण्यात आली. तसेच अनिताताई सरोदे, श्री अच्युताश्रम स्वामी महाराज, प्रमोद अंभोरे आदींना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी आ. डॉ. राहुल पाटील, मा. खा. तुकाराम रेंगे पाटील, श्री अच्युताश्रम स्वामी महाराज, संजय देशमुख आदींनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल वहिवाळ यांनी केले तर आभार दिलीप बनकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वाजीद खान पठाण, दिलीप बनकर, प्रमोद अंभोरे, राहुल धबाले, राहुल पुंडगे, पठाण अब्दुल रहमान खान, शेख अझहर, संदीप वायवळ, शेख सरफराज, फारुख लाला आदींनी परिश्रम घेतले.
परभणी येथे स्वातंत्र्य दिनाचे विविध कार्यक्रम...लोक स्वातंत्र्य अध्यक्ष संजय देशमुख यांचे हस्ते श्री छत्रपती शाहू विद्यालयात व माता रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतीगृहात ध्वजारोहण करण्यात आले.त्यानंतर सतिश धोत्रे यांच्या ईश्वरी इ सेवा केन्द्राच्या वतीने तिरंगा ध्वजाचे वितरण व जिल्हा सामान्य रूग्णालयात रूग्णांना फळवाटप करण्यात आले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....