पूर्वीच्या काळी घरचे बियाणे,घरचेच शेणखत याचा वापर होत असल्यामुळे रासायनिक खतांचा वापर फार कमी प्रमाणात होत असे व यामुळे जमिनीचा पी एच योग्य प्रमाणात राहत असे व यामुळे जमिनीवर जास्त औषध फवारणी करावी लागत नसे पण दुर्दैवाने अलीकडच्या काळात रासायनिक खत व कीटकनाशकाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे जमिनीची सुपीकता दिवसेंदिवस कमी होत असून रोगाचे प्रमाण वाढत आहे यामुळे जमिनीचे व शेतकरी बाधवांचे आर्थिक बजेट बिहडून गेले आहे यावर उपाय म्हणजे शेंद्रिय खताचा वापर करून फार कमी प्रमाणात रासायनिक खत वापरणे हा आहे असे प्रतिपादन प्रा प्रकाश बगमारे यांनी किन्ही येथील प्रगती शिल शेतकरी यांच्या शेतावरील भेट प्रसंगी व्यक्त केले याप्रसंगी शेंद्रीय शेती तज्ञ श्री राजू पाटील गावंडे नागपूर,प्रभू बगमारे किन्ही,अरुण दोनाडकर किन्ही,वासू सोंदरकर उपस्थित होते