चहा.!
चहा मनापासून आवडत नाही
तल्लफ काय असते माहीत नाही !!
आयुष्य म्हणजे चहा असतो
पृथ्वीवरचा तो बादशहा असतो
चहा मनापासून आवडत नाही
तल्लफ काय असते माहीत नाही
चहा सुस्त शरीरात जोम आणतो
पचनशक्ती बिघडून अल्सर होतो
चहा मनापासून आवडत नाही
तल्लफ काय असते माहीत नाही
आजार नष्ट करत गुळाचा चहा
आरोग्यास घातक दुधाचा चहा
चहा मनापासून आवडत नाही
तल्लफ काय असते माहीत नाही
चहा दारुपेक्षा घातक आहे
चहा बरी दारु बदनाम आहे
चहा मनापासून आवडत नाही
तल्लफ काय असते माहीत नाही
खरचं मित्रहो चहा नका पिऊ
मानवी शरीर निरोगी ठेऊ
चहा मनापासून आवडत नाही
तल्लफ काय असते माहीत नाही
कवि
पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर
श्रीगुरुदेव प्रचारक, यवतमाळ
फोन- 9921791677
आपल्या प्रतिक्रिया द्या....