अकोला - गुरुवार दि. 05/09/2024 रोजी नाथ समाजाच्या उन्नतीसाठी झटणाऱ्या वैदर्भिय नाथ समाज संघाच्या वतीने नाथ समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाच्या मागणीसाठी मोर्चे, धरणे आंदोलन, तसेच शेकडो निवेदने राज्य शासनाला पाठविल्यानंतर सुध्दा यांची दखल राज्य सरकारने न घेतल्यामुळे अखेर वैदर्भिय नाथ समाज संघाच्या वतीने राज्यपालांकडे इच्छामरणाची परवानगी पदाधिकान्यांनी आज अकोला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत दिलेल्या निवेदनात मागितली आहे. सदर निवेदनात त्यांनी नमुद केले आहे की, लिंगायत, गुरव, वडार, रामोशी, सुतार, न्हावी, खाटिक राजपुत, बारी, ब्राम्हण, विणकर तसेच तेली या समाजाकरीता शासनाने स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळे निर्माण केलीत. विशेष म्हणजेच यातील बऱ्याच समाजांनी कुठल्याही प्रकारची मागणी राज्य शासनाकडे केली सुध्दा नव्हती. परंतु राज्यातील अतिशय मागास स्थितीमध्ये असलेला नाथ समाज मात्र कायम दुर्लक्षित राहिला आहे. वैदर्भिय नाथ समाज संघाच्या माध्यमातून श्री. मच्छिद्रनाथ आर्थिक विकास महामंडळाच्या निर्मितीसाठी आजतागायत विविध प्रकारची आंदोलने, मोचें, धरणे आंदोलने व राज्यभरातून शेकडो निवेदने मुख्यमंत्री एकनाथ शिदे तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे देऊनही स्वतःला नाथ भक्त म्हणून आपल्या नेत्यांवर फक्त सिनेमे काढणाऱ्यांना अजुनही जाग येत नसल्यामुळे या नाथसमाज द्वेशी राज्य सरकारच्या दुजेभावाला कंटाळून आम्ही वैदर्भिय नाथ समाज संघाचे पदाधिकारी आपणांस इच्छामरणाची परवानगी मागत आहोत,
महामहीम राज्यपालांनी महामंडळाच्या स्थापनेसाठी राज्यशासनाला आदेशित करावे किंवा आम्हाला इच्छामरणाची परवानगी द्यावी. असे सदर निवेदनात नमुद केलेले आहे. निवेदन देतेवेळी वैदर्भिय नाथ समाज संघाचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ पवार, सचिव संतोष सातपुते विदर्भ समिती अध्यक्ष स्वप्नील पाजनकर, अकोला जिल्हा समिती अध्यक्ष संतोष चिलवंते, अकोला जिल्हा समिती सचिव विनोद चव्हाण, अकोला जिल्हा समिती उपाध्यक्ष सदानंद चिलवंत, यवतमाळ जिल्हा समिती अध्यक्ष लक्षण विजयकर, अमरावती जिल्हा समिती उपाध्यक्ष गजानन सोनोने, प्रसिध्दीप्रमुख आकाश वाडेकर, संतोष सोनुले,अकुश जाधव, हरिनाथ विधाते, निवृत्ती सौदागरे, यश हिरडे, जय चर्तुभुज, सुरज सोनोने, कृष्णकांत मेहरे, गजानन कोहेकर, संतोष सोनुले, अशोक तिहिले, माणिक पारसकर व इतर बरेच नाथ समाज बांधव उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....