कारंजा : शहरातील प्रसिद्ध ऐतिहासीक ऋषीं तलाव व नगर वन टेकडी परिसरातील ऋषी महंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऋषी तलाव मधील नौका विहार चा भूमिपूजन सोहळा आज दि. 8 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11.30 वाजता कारंजा मानोरा च्या आमदार श्रीमती सईताई प्रकाशदादा डहाके यांच्या हस्ते संपन्न झाला.
ऐतिहासिक ऋषी तलाव व परिसरातील नगर वन टेकडी हा परिसर वनविभागाच्या अखत्यारित येतो स्थानिक आमदार सईताई डहाके यांच्या प्रयत्नाने व वनविभागाने सदर परिसराचे सौंदर्यकरण या ऋषी तलाव मध्ये नौका विहाराची योजना अस्तित्वात आणण्याकरिता शासनाकडे सात कोटी रुपये च्या निधीची मागणी केली होती. कारंजातील लेक मा. सौ. किरण ताई वळसे पाटील जावई नामदार मा. श्री दिलीप वळसे पाटील यांच्या पुढाकाराने मा. ना. अजित दादा पवार उपमुख्यमंत्री यांनी सदर ऋषी तलावाच्या नौकाविहार योजना व परिसरातीलच वनविभागाच्या नगर वन टेकडी च्या सौंदर्यीकरण करण्याकरता 4 करोड रुपयांचा निधी तत्काळ मंजूर करून दिला. निधी प्राप्त झाल्यामुळे आज कारंजा सर्वांच्या स्वप्नातील ऋषी तलावा मधील नौका विहार चे आज भूमिपूजन थाटात संपन्न झाले.

या वेळी वाशीम-मंगरूळपीर चे मा. आ. श्यामभाउ खोडे, माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके, श्री नरेद्रजी गोलेच्छा, मा. डॉ. राजीव काळे, मा. श्री अभिजीत वायकोस उपवनसंरक्षक वाशिम, कु. शरयु रुद्रवार सहाय्यक वनसंरक्षक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या प्रसंगी मंचावर उपस्थितत मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले या प्रसंगी मा. आ. सईताई डहाके म्हणाल्या की ऋषी तलाव सौदर्यकरण हा स्व आ. प्रकाशदादा डहाके यांचे स्वप्न होते. शहराच्या सौदर्यात भर पाडून नागरिकांना पर्यटन व रोजगार उपलब्ध करण्याच्या हेतुने सदर कामाकरीता सर्व मा. मुख्यमंत्री साहेब सहकारी मित्रपक्षातील नेते या सर्वाच्या सहकार्याने निधी कमी पडु देणार नाही अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली.
अमित शिंदे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी ऋषीं तलाव या बद्दलची पार्शभूमी विषद करून भविष्यातील वनविभागाद्वारे करण्यात येणाऱ्या कामाविषयी विस्तृत माहिती दिली. अभिजीत वायकोस सर या प्रसंगी ऋषीं तलाव बाबत प्रास्ताविक करून आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष राजीवजी काळे
माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके माजी नगराध्यक्ष
नरेंद्रजी गोलेच्छा कौस्तुभ डहाके तसेच कारंजा येथील निसर्गप्रेमी, पर्यावरणवादी, सुजाण नागरिक, पत्रकार आदींची मोठ्या संख्येत उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विशाल हलगे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सर्व वनपाल खंडारे, सोनवणे व सर्व वनरक्षक शिंदे, देवढे, बोबडे, करे, कुटे, पवार, हुमणे कु. घटाळे,वायकर, राठोड तर वनमजूर थेरं, भगत व श गोलू पुरोहित,आकाश, आतिश, प्रवीण, गुल्हाने, ई. परिश्रम घेतले. असे वृत्त प्रत्यक्षदर्शी करंजमहात्म्य परिवाराचे ज्येष्ठ समाजसेवी संजय कडोळे यांनी कळवीले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....