कारंजा : समाजामध्ये पर्यावरणाविषयी सकारात्मक संदेश देण्याचे उद्देशातून,श्री चवऱ्या महादेव संस्थान शेलूवाडा येथे ग्रामस्थांच्या प्रबोधनाकरीता, खास होळी निमित्ताने "आदर्श जय भारत सेवाभावी संस्थेकडून", "सुविचार संमेलन रंग संगीत महोत्सव" आयोजीत करण्यात येऊन, त्यामध्ये होळी निमित्त युवा साहित्यीक असलेल्या गोपाल खाडे गुरुजी यांचा "इच्चू काटा" हा काव्यमैफिलीचा आणि मित्रमंडळीच्या गीत गायनाचा शिस्तबद्ध असा सुरेख कार्यक्रम घेण्यात आला.होळी निमित्त धुडवडीचा ( रंगपंचमी )पवित्र सण साजरा करण्यात आला असून,या कार्यक्रमाच्या उद्देशाने, मनुष्यप्राण्याला फळ,फुल, औषधी, प्राणवायू देणाऱ्या वृक्ष लागवडी व संगोपनासंदर्भात माहिती देऊन वृक्षाची कत्तल न करण्याबाबत विनंती करण्यात आली. तसेच आरोग्याकरीता शेतीद्वारे मिळणारे शाकाहारी अन्न हे माणसाकरीता अत्यावश्यक असून "आपला मानवी-आहार हा शाकाहार" आहे.खरे तर मांसाहार आपले खाद्य नव्हे. तसेच दारू,गांजा,अफू,तंबाकू, गुटखा,बिडी,सिगारेट ही दुर्व्यसने आरोग्याकरीता घातक असून, कॅन्सर,कर्करोग,तोंडाचे व आतड्याचे आजार, माणसाचे डोके सुन्न करून मानसिक स्वास्थ बिघडविणारे असतात.त्यामुळे १०० % व्यसनमुक्त होळी साजरी करीत, शरिराला घातक असणारे रासायनिक रंग न वापरता आणि पाणी हे जीवन आहे. त्यामुळे धुळवडी करीता पाण्याचा नासोडा न करता, लाखो लिटर पाण्याची बचत करून, पूर्णतः आरोग्यदायी होळी खेळण्याकरीता यावेळी हळदीपासून तयार केलेल्या कोरडया रंगाचा वापर करून होळी खेळण्याचा आनंद साजरा करण्यात आला.यावेळी शेलूवाडा येथील ग्रामस्थांनी उपस्थित राहून चांगला प्रतिसाद दिला. या यशस्वी ठरलेल्या प्रयोगाचे आयोजन,समाजाकरीता तन मन धनाने निस्वार्थ कार्य करणारे डॉ ज्ञानेश्वर गरड आणि त्यांच्या मित्रमंडळीनी केले होते. विशेष म्हणजे कार्यक्रमाला कारंजा ग्रामिण पोलिस स्टेशनचे ए एस आय धनराज पवार यांनी स्वतः भेट दिली व कार्यक्रमाची माहिती घेत व्यसनमुक्ती बाबत जनजागृती करणारी आगळी वेगळी होळी साजरी केल्याबद्दल डॉ.ज्ञानेश्वर गरड व मित्रमंडळीचे अभिनंदन केले. सर्वात महत्वाचे म्हणजे विदर्भातील पंधरा हजार तिनशे छप्पन्न व्यसनी व्यक्तिंना आपल्या प्रबोधनातून दारूमुक्त करून, व्यसनामुळे कित्येक व्यक्तीचे विस्कटलेल्या संसाराशी त्यांना जोडीत त्यांच्या पारिवारात कायमस्वरूपी आनंद व नवचैतन्य निर्माण करणारे, दारूबंदी व्यसनमुक्तिचे प्रचारक दिलीपजी गिल्डा यावेळी कार्यक्रमाला जातीने उपस्थित होते. त्यांनी होळीच्या दिवशी ग्रामस्थाच्या हजेरीत होणारा धुळवडीचा एवढा चांगला प्रयोग मी पहिल्यांदा बघीतलेला असून, या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजना बद्दल त्यांनी आयोजक आदर्श जय भारत समाजसेवी संस्थेचे अध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर गरड,संस्थेचे पदाधिकारी व मित्रमंडळी आणि कार्यक्रमाचे प्रायोजक दारुबंदी व्यसनमुक्तीचे समाजप्रबोधनकार असलेले साप्ताहिक करंजमहात्म्य या लोकप्रिय वृत्त पत्राचे संपादक संजय कडोळे आणि डॉ. ज्ञानेश्वर गरड यांच्या पाठीशी खंबिरपणे राहून त्यांना सहकार्य करणाऱ्या समाजसेविका श्रीमती पार्वताबाई शिंदे यांचे कौतुक केले आहे.