कारंजा (लाड) : या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी कोठेही मागे पडू नये व आत्मविश्वासाने समोर जावं यासाठी नेक्स्ट स्टेप अकॅडमी तर्फे नुकताच रामानुजन टॅलेंट स्पर्धेचा कार्यक्रम दि.11/2/2024 ला आयोजित केला होता ज्यामध्ये 850 विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहात आपली उपस्थिती दर्शविली.
सदर स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ नुकताच पार पडला समारंभाला अध्यक्ष म्हणून केशवराव मराठे माजी मुख्याध्यापक वसंत माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय , तसेच अध्यक्ष मराठा सेवा संघ गृहनिर्माण संस्था राजे संभाजी नगर कारंजा लाड हे होते व प्रमुख पाहुणे म्हणून,गणेश शंकरपुरे सर ( मुख्याध्यापक), सुनील गोरटे सर (सेवानिवृत्त शिक्षक),संजय रिटे सर (माझी प्राध्यापक समृद्धबाई महाविद्यालय मानोरा),सफल आगे सर (सहायक शिक्षक),वासुदेव रावजी कदम सर (सेवानिवृत्त एसटी महामंडळ),महादेव रावजी ठाकरे सर (सेवानिवृत्त को-ऑपरेटिव्ह बँक) , तारादासजी चौधरी सर (मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा), श्री अजय मोडघरे सर (सहायक शिक्षक )हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्ताविक शुभम गोरटे सरांनी केले तसेच कार्यक्रमाचे संचालन फुलाडी मॅडम यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन व गणपती पूजन करून करण्यात आली. त्यानंतर पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले ज्यामध्ये अध्यक्षांचे स्वागत शुभम गोरटे सर यांनी तर इतर पाहुण्यांचे स्वागत सारंग गोरटे सर, हेमंत राठोड सर, गौरव शंकरपुरे,रूपाली गोरटे मॅडम,ऋतुजा मॅडम , सुशांत सर यांनी केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात पाहुण्यांनी NEXT STEP ACADEMY द्वारे घेण्यात आलेल्या या उपक्रमाची प्रशंसा करून त्याचे महत्व अधोरेखित करून सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये
गट A मधून अर्नव मंदावणे
(प्रथम) R J School , ऋग्वेद राऊत Nagawani school, व हिमानी चीपडे (द्वितीय),R J School
ओवी मनगटे (तृतीय) R J School
गट B मधून अर्णव काचेवार (प्रथम) R J School , सुजल धामणे(द्वितीय) JC school, नव्यानं इंगोले (तृतीय) RJ school
गट C मधून प्रियांशी डबाले (प्रथम) RJ school , सुफियान फरालानी (द्वितीय) Vidyarambh school , श्रेया वाघमोडे(तृतीय) nagwani school
गट D
मधून
कार्तिक भेंडे (प्रथम) RJ school , सृष्टी कदम (द्वितीय) Vidyarambh school , सुजल जाधव(तृतीय) Rj-school
यांना पुरस्कार देण्यात आले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सारंग गोरटे सरांनी केले.असी माहिती महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांच्याकडे प्रसिद्धी पत्रकाद्वारे शुभम गोरटे सर यांनी दिली.
आपल्या प्रतिक्रिया द्या....