कारंजा : "धन्य ती करंजनगरी, जणू जाहली पंढरी । विठुनामाचा गजर,अवतरला येथे रुक्मिणीवर ॥" अशाप्रकारचा अनुभव रविवारी दि .१० जुलै रोजी कारंजा नगरीत पहायला मिळाला. याबाबत सविस्तर वृत्त असे की, स्थानिक कारंजा मुर्तिजापूर मार्गावरील, विकास महर्षी स्व. प्रकाशदादा डहाके वन पर्यटन केन्द्रा समोरील टेलिफोन कॉलेनी स्थित, श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात लाखो हरीभक्तांच्या उपस्थितीने परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झालेले होते. व लाखो हरीभक्तांची गर्दी असूनही अत्यंत शांतता व शिस्तीत सयंम व सहनशिलता ठेऊन संपूर्ण दिवसभर महिला पुरुष भक्तमंडळी अत्यंत आनंदाने दर्शन घेत होती तसेच श्री विठ्ठल रखुमाई मंदिर समितीने भाविकांच्या फराळाची व पिण्याच्या पाण्याची चोख व्यवस्था ठेवलेली होती.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेल्या दोन वर्षाच्या कोरोना कालावधीनंतर, मुक्तपणे उत्साहात साजऱ्या होणाऱ्या आषाढ शुद्ध देवशयनी एकादशी निमित्त सकाळीच श्री विठुरुक्मीणी अभिषेक, काकड आरती नंतर दर्शनास सुरुवात झाली. यावेळी श्री विठ्ठल रखुमाई मंदिर समिती व्यवस्थापक मंडळी तथा कारंजेकर भक्तमंडळीनी दर्शनाची उत्तम व्यवस्था केलेली होती असे प्रत्यक्षदर्शी महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषदेचे वाशिम जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांना सेवाधारी हभप किन्हीकर महाराज, प्रकाश गवळीकर, पुजारी पुरोहीत महाराज, सेवक दिलीप गाडबैल यांनी सांगीतले.तसेच दि.११ जुलै रोजी बारशी निमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम असल्याचे सुध्दा कळवीले . याप्रसंगी कारंजा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार आधारसिह सोनोने व त्यांच्या स्टॉपने उत्तम बंदोबस्त ठेवलेला होता.