ब्रह्मपुरी... ब्रह्मपुरी- आरमोरी राष्ट्रीय महामार्गावर (353 डी) या मार्गावर नेहमीच अपघाताची मालिका सुरू असते. यात अजता गायत पन्नासहुन लोकांचा अपघातात बळी गेला असून अनेक नागरिक गंभीरित्या जखमी झाले आहेत. त्यातच अनेकांना अपंगत्व सुद्धा आले आहे. मात्र या राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणारे अनेक नागरिक सामाजिक बांधिलकी जोपासत. घडलेल्या अपघातातील अनेक नागरिकांसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेक अपघाती प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी धडपड करीत आहेत. यासारख्या अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत.
मात्र दिनांक 17 जून 2023 रोज सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान ब्रह्मपुरी येथील पंचायत समितीचे माजी सभापती रवींद्र मेश्राम व त्यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्या दिपाली रवींद्र मेश्राम यांच्या आमने-सामने ब्रह्मपुरी आरमोरी राष्ट्रीय महामार्गावरील उदापूर नजीक प्रभू कृपा राईस मिल जवळ एक मोटर सायकल व सायकल चालक यांच्यातअपघात घडला. त्यात सायकल चालक गंभीरित्या जखमी झाला. हा घटनाक्रम त्यांच्या लक्षात येताच. वेळीच क्षणाचाही विलंब न करता त्यांनी अपघातग्रस्त सायकल चालकाला व दुखापतग्रस्त कार्यरत डॉक्टरांना सुद्धा (दोन्ही अपघातग्रस्तांना) ब्रह्मपुरी येथील सामान्य ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करून व डॉक्टरांशी मोबाईल वरून संपर्क करून तत्काळ उपचार देण्याची मागणी केली. त्यामुळे अपघात ग्रस्त रुग्णांचे प्राण वाचले. . सायकल स्वार सदर व्यक्ती सोनेगाव येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. तर मोटर सायकल चालक व्यक्ती मूडझा पी एच सी मध्ये डॉक्टर असून त्यांना सुद्धा गंभीर स्वरूपाची दुखापत झाली असल्याचे समजते. ब्रह्मपुरी येथील सामान्य रुग्णालयातील डॉक्टर कांबळे यांच्याशी प्रत्यक्षदर्शी प्रस्तुत प्रतिनिधींनी संपर्क साधला असता. सध्या सायकल स्वार अपघातग्रस्त रुग्णांची प्रकृती ठीक असून आमच्या अनुभवानुसार त्यांच्यावर योग्य उपचार सुरू असल्याची माहिती सदर डॉक्टरांनी दिली आहे