ब्रम्हपुरी रेल्वे स्थानकालगत असलेल्या रेल्वे क्रॉसिंग मध्ये नागरिकांना व व्यावसायिकांना फाटक बंद अवस्थेत असतांना होणाऱ्या अगणिक त्रासामुळे शहरातील नागरिकांना, व्यावसायिकांना व शहरात येणाऱ्या बाहेरील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे तसेच फार अरुंद असलेल्या जागेतून वाहने ये-जा करतांना नियमित किरकोळ अपघात होत आहेत. वारंवार येणाऱ्या-जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमुळे वाहतूक सतत बंद असते त्यामुळे वाहणाची लांबचं लांब रिघ लागत असल्याने तासन तास नागरिक व मोठं मोठे वाहन अडकून असतात.सर्वांना होणाऱ्या रेल्वे फाटकेच्या असुविधेतून योग्य निर्णय घेऊन मार्ग काढत नागरिकांना व व्यावसायिकांना दिलासा मिळवून देण्यात यावा यासाठी सामाजिक दायित्व जोपासत देशातील क्रमांक दोनची कंपनी असलेल्या ब्रम्हपुरी येथील रामदेवबाबा या नामांकित ऑइल कंपनीचे संचालक श्री.निलेशजी मोहता व श्री.तुषारजी मोहता यांनी क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते यांची रेल्वे क्रॉसिंग ठिकाणा दरम्यान रस्त्यावर येत ब्रम्हपुरीला उड्डानपुल बांधकामासाठी निवेदन देत मागणी केली तर खासदार साहेबांनी काही महिन्यातच बांधकाम सुरु करणार असल्याचे उपस्थितां समक्ष शब्द दिला आहे.
रामदेवबाबा ऑइल मिल देशात राईस ब्रान पासून तेल बनविण्यात क्रमांक दोनची कंपनी असून सदर कंपनीला देशात मोठा नावलौकिक आहे. कंपनी ने विविध स्तरावर केलेल्या उत्कृष्ट कामाची पावती म्हणून कित्तेक अवार्ड कंपनीला मिळालेले आहेत. क्षेत्र कुठलाही असो रामदेवबाबा ऑइल मिल सामान्यांना मदत करण्यात पुढाकार घेत असून संचालक मंडळ नेहमीच मदतीला तत्पर असतात. लगतच्या ग्रामीण भागात आर्थिक मदत,पिण्याचे पाणी, पर्यावरण समतोल किव्हा गरजूना मदत करण्यात संचालक मंडळं नेहमीच औद्योगिक व शासकीय नियमावली तसेच सामाजिक दायित्व जोपासात पुढाकार घेत असतात.
शहराच्या हद्दीतून गेलेल्या आरमोरी महामार्गांवरून रोज हजारो वाहने ये-जा करतात. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. उड्डाणपूल झाला की वाहतूक सुरळीत होईल, असे ब्रम्हपुरीकरांना वाटते पण वर्षामागून वर्ष गेले मात्र उडानपुलाचा प्रश्न सुटता सुटेना उलट, वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालला आहे.या गंभीर बाबीला गांभीर्याने घेत रामदेवबाबा ऑइल मिल कंपनी तर्फे संचालक निलेशजी मोहता व तुषारजी मोहता यांनी आपल्या मित्रपरिवार तथा कंपनी कर्मचाऱ्यांसह क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते यांची ब्रम्हपुरी प्रवासादरम्यान भेंट घेत उड्डानपुलाची गरज व नागरिक, व्यवसायिकांना होणारा मनस्ताप मोठ्या आत्मीयतेने खासदार साहेबांच्या निदर्शनास आणून देत उड्डानपुलाची मागणी लावून धरली तर खासदार साहेबांनी सुद्धा सदर मागणी रास्त असल्याचा दुजोरा देत अवघ्या काही महिन्यात उड्डानपूल होणारच म्हणून शब्द दिला आहे.
शेतकरी व स्थानिकांना मोठी संधी
स्थानिक तरूणांना नोकरी देत त्यांच्या उपजिविकेसाठी मदत करणे हे रामदेवबाबा ऑइल कंपनी संचालक मंडळाने आपले कर्तव्यच केले आहे.
ब्रम्हपुरी क्षेत्रात एम. आय. डी. सी. अस्थीत्वात नसल्याने रोजगारासाठी स्थानिकांना वन-वन फिरावे लागत होते काही राईस मिल वगळले तर रोजगाराला इथं वाव नाही मात्र देशातील क्रमांक दोनची कंपनी असलेल्या रामदेव बाबा ऑइल कंपनी मुळे धान शेती उत्पादक शेतकरी त्यांच्या उत्पादनाला मोठा भाव मिळत असल्याने सुखावले आहेत तर स्थानिकांनी या कंपनीच्या माध्यमातून रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झाल्याने समाधानी असल्याचे बघायला मिळत आहे. कर्मचाऱ्यांनी त्यांना मिळत असलेल्या संधीचा प्रामाणिकपणे वापर करून त्यांच्या उद्योजकाला व उद्योगाच्या प्रगतीसाठी संपूर्ण साथ देत वेळ, काळ, दिवस न पाहता कामे केली पाहिजेत. स्थानिक पुढाऱ्यांनीसुद्धा उद्योजकाला अडचणीत न आणता सक्रीय मदत केली तर भविष्यात स्थानिक बेरोजगारी नक्कीच कमी होणार असे दिसून येत आहे.
पर्यावरण पूरक दृष्टिकोन
पर्यावरण संरक्षण ही सामाजिक जबाबदारी असून समाजातील प्रत्येकाने पर्यावरण संरक्षणासाठी काम करणे ही आपली सामाजिक बांधीलकी आहे आणि याचं उक्तीला अनुसरत रामदेवबाबा ऑइल कंपनी संचालक मंडळ व मित्रपरिवार तर्फे परिसरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येत असते. सदर परिसर हिरवेगार असून याठिकाणी हिरव्यागार वृक्षामुळे नेहमीच गारवा मिळत असतो.ध्वनी, वायू व पाणी प्रदूषण याबाबत रामदेवबाबा ऑइल कंपनी जागृत असून परिसरातील आलेल्या समस्यावर तातडीने उपाययोजना शोधत सदर कंपनीने नेहमीच सामाजिक दायित्व जोपासत व सर्व शासकीय नियमावलीला उत्तमरित्या प्रतिसाद देत योग्य कार्य करीत आहे.