कारंजा (लाड) (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे): "गुरुपोर्णिमा"ह्या दिवसाला हिंदु धर्मियांमध्ये, शिष्यमंडळी किंवा अनुयायामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे.संपूर्ण भारता मध्ये कारंजा शहर हे श्री दत्तावतार श्री.नृसिह सरस्वती स्वामी महाराज यांची जन्मभूमी गुरुपीठ म्हणून ओळखली जाते.आणि त्यामुळे आषाढ शु पोर्णिमा,सोमवार दि. 3 जुलै 2023 रोजी श्री गुरुपोर्णिमेला,कारंजा शहरात श्री. गुरुदत्त उपासकांची मांदियाळी बघायला मिळाली.
आज प्रातःकाली पाच वाजे पासूनच, उत्तररात्री पर्यंत गुरुपोर्णिमा महोत्सवा निमित्ताने,देश विदेशातून आलेल्या दर्शनार्थीची रेलचेल दिसून येत होती. मंदिराच्या आजूबाजूच्या रस्त्यावर आणि श्री गुरुमंदिराच्या वाहनतळावर बाहेरगावच्या वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या दिसून येत होत्या.
सकाळपासून संपूर्ण दिवसभर काकडआरती, महाभिषेक,दुपारची आरती, महाप्रसाद, भजन,पूजन,प्रवचन, सांयकाळी हरिपाठ, मंदिरात श्री गुरुंची पालखी पदयात्रा संपन्न करण्यात आली.एकंदरीत श्री गुरु पोर्णिमेमुळे लाखो भाविकांनी दर्शन घेतल्याचा होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असल्याचे वृत्त वारकरी मंडळाचे संजय कडोळे यांनी कळविले आहे .