अकोला: स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या माध्यमाने डॉ.विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण भारतात दिव्यांग व्यक्तींना विविध शैक्षणिक साहित्याचे वितरण केले जात आहे . दिव्यांगांचे प्रेरणास्थान डॉ हेलन केलर यांच्या जयंतीनिमित्त दि.१९ जुलै २०२४ रोजी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला व अनंत द्वारकामे बहुउद्देशीय संस्था शेलुबाजार यांच्या संयुक्त आयोजनातून अंध विद्यार्थ्यांसाठी ब्रेल पुस्तकांचे वितरण करण्यात आले. अनंत द्वारकामे बहुद्देशीय संस्था शेलुबाजार च्या अध्यक्ष दुर्गा दुगाने यांनी विविध समाज माध्यमावरून दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे निस्वार्थ कार्य जाणून घेतले .अनंत द्वारकामे बहुउद्देशीय संस्था व दिव्यांग सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त आयोजनातून गरजू अंध विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी अत्यंत उपयोगी असणारी ब्रेल पुस्तके वितरित करण्यात आले.समाज कल्याण विभागाचा आदर्श संस्था पुरस्कार प्राप्त असणाऱ्या दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या उपक्रमात समाजातील विविध सामाजिक संस्था , महिला मंडळ व दानशूर व्यक्तींनी सहकार्य करावे असे आव्हान दुर्गा दुगाने यांनी केले .
ज्या गरजू दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व शिष्यवृत्ती हवी असेल अशा सर्वांनी ९४२३६५००९० या संस्थेच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा अशी माहिती आमच्या प्रतिनिधीशी बोलताना संस्थेच्या सचिव पूजा गुंटीवार यांनी दिली.सदर कार्यक्रमात दिव्यांगांचे प्रेरणास्थान डॉ.हेलन केलर यांच्या जीवनावर आधारित ध्वनी मालिका अंध विद्यार्थ्यांना ऐकविण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेच्या अनामिका देशपांडे, विजय कोरडे, अस्मिता मिश्रा,नेहा पलन, प्रतिभा काटे, सरोज तिडके,नयना लवंगे व सिद्धार्थ ओवे यांनी सहकार्य केले .