कारंजा (लाड) : श्री रुक्मिणी पिठ श्री रुक्मिणी मंदिर, अंबिकापूर-श्रीक्षेत्र कौंडण्यपूर जि.अमरावती येथील श्री गुरुमाऊली,पिठाधिश्वर श्रीमद् जगद्गुरू रामानंदाचार्य राजेश्वर माऊली सरकार,यांनी कारंजेकर शिष्यवृंदाच्या आग्रहाखातीर, बुधवार दि.२० डिसेंबर २०२३ रोजी रात्री ठिक ०७:०० श्रीक्षेत्र जुळवा हनुमान संस्थान,वाल्हई फाटा कारंजा येथे भेट देऊन, आपल्या प्रवचनाद्वारे मार्गदर्शन करीत सस्नेह साधुवाद देऊन आशिर्वाद दिले.यावेळी सलग दुसऱ्या दिवशी अकस्मात "न भुतो न भविष्यती" अशाप्रकारे श्री गुरु माऊली सरकार यांच्या भेटीचा अमृत योग आल्यामुळे शिष्यमंडळीच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वहात होता.

याप्रसंगी माऊलीचे शेलुवाडा येथील परम शिष्य रामदास कांबळे, बेलमंडळ येथील राजेंद्र पाटील घुले,जिल्हा परिषद वाशिमच्या माजी अध्यक्षा ज्योतीताई गणेशपुरे,खेर्डा येथील विजय येवले,कारंजा येथील माणिकराव राऊत,अमित राऊत, अनिल पाटील गणेशपुरे,मनोहर पाटील गालट,अँड विजय छल्लानी,धिरज रामदास कांबळे, पत्रकार किरण क्षार, सुनिल दहापुते,वाशिम येथील राजेश बायस्कर,कारंजा येथील प्रविण रोकडे, नरेंद्र सरजे (जुळवा हनुमान संस्थान), शरद ठाकरे, धनराज कांबळे,सुर्यकांत जयस्वाल,बाबरे परिवाराचे सदस्य तसेच सिताराम गुरुजी,किरण रामदास कांबळे,जय भवानी जय मल्हार वारकरी मंडळ कारंजाचे संजय कडोळे,कैलास हांडे,उमेश अनासाने इत्यादी भाविक मंडळीची उपस्थिती होती.याप्रसंगी "कारंजा नगरी श्री गुरुमाऊली यांची पवित्र नगरी असून,जुळवा हनुमान संस्थान हे पवित्र पावन जागृत ठिकाण असून,येथे बडे सरकार - छोटे सरकार जुळवा हनुमान यांचे निवास असून,जीवनात सफल होण्याकरीता "सिताराम सिताराम सिताराम जय जय सिताराम" नामस्मरण हा एकमेव तारक मंत्र असल्याचे जगद्गुरू रामानंदाचार्य राजेश्वर माऊली सरकार यांनी सांगीतले." तसेच श्री हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी आपण येथे जरूर येणार असल्याचे उद्गार काढले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....