कारंजा स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव मेरी मिट्टी मेरा देश अभियानांतर्गत गोविंद स्कूल येथे स्वातंत्र्यदिनी सकाळी ध्वजारोहण केल्यानंतर शाळेचे अध्यक्ष माननीय श्री किरण चौधरी सर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात शाळेत शालेय विद्यार्थ्यांनी बहारदार राष्ट्रगीत, झंडागीत तसेच महाराष्ट्र गीत सादर केले. त्यानंतर विद्यार्थ्यांची भाषण स्पर्धा गायन स्पर्धा चित्रकला स्पर्धा विद्यार्थ्यांनी तयार केलेले विविध देशांचे नकाशांचे अनावरण करण्यात आले. अमृतवाटिकेत वसुधा वंदन अंतर्गत मान्यवरांच्या हस्ते विविध रोपांची लागवड करण्यात आली.
5च्या स्वातंत्र्य दिनाच्या सांगता पर अमृत महोत्सवानिमित्त शाळेतील विद्याथ्र्यांची १२ ऑगस्ट रोजी भव्य अशी रॅली काढण्यात आलेली होती मातृभूमीची स्वतंत्रता आणि तिचा गौरव यांच्या रक्षणाकरिता बलिदान दिलेल्या वीरांना मानवंदना देण्यात आली.
कार्यक्रमाला शाळेचे संचालक श्री चौधरी सर खिलाड़ी सर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.
त्याचप्रमाणे गोविंद शाळेच्या मुख्याध्यापिका कुमारी अपर्णा कदम मॅडम तसेच सर्व शिक्षक वृंदाद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन श्री.वडते सर व कु. रीना कनोजे मॅडम यांनी केले.
तसेच आभार प्रदर्शन कु. संगीता गढ़वे मॅडम यांनी केले.