डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, barti पुणे अंतर्गत, 6 एप्रिल ते 16 एप्रिल पर्यन्त समता साप्ताह निमित्त विविध उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबविले जात आहेत. ब्रह्मपुरी तालुक्यातील समतादूत वर्षा कारेंगुलवार व रज्जूताई मेंदूलकर तालुक्यातील प्रत्येक गावात शाळेत,बुद्ध विहार,सार्वजनिक ठिकाणी वेग वेगळ्या विषयावर समतेवर आधारित मार्गदर्शक करून बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वि जयंती निमित्त संपूर्ण महाराष्ट्रात समता सप्ताह राबविले जात आहेत महिलांना वेग वेगळ्या विषयावर मार्गदर्शन व थोर महापुरुष जयंती सुद्धा साजरी करण्यात आली.
त्या मध्ये अशोक सम्राट यांची जयंती चिंचोली येथील बुद्ध विहार मध्ये साजरी करण्यात आली. तसेच 11 एप्रिल ला महात्मा जोतिबा फुले यांची जयंती कार्यक्रम लोकमान्य टिळक विद्यालय ब्रह्मपुरी व डॉ पंजाबराव देशमुख विद्यालय ब्रह्मपुरी ईथे साजरी करण्यात आली यावेळेस विद्यार्थ्यांना महात्मा फुले यांचे कार्य विद्यार्थ्यांना सांगण्यात आले कोविड मुडे पहिलीत ला विद्यार्थी एकदम तिसर्या वर्गात गेला त्यांचे दोन वर्षे पूर्ण खाली डोक आहेत.
त्या विद्यार्थ्यांना कुठलेही जयंती पुण्य तिथी माहिती हे नाही अश्या वेळेस समतादूत वर्षा कारेंगुलवार व रज्जूताई मेंधुळकर यांनी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांना त्यांच्या भाषेत मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करीत आहेत या समता साप्ताह निमित्त सलग 10 ते 18 वाचन स्पर्धा सुद्धा लोकमान्य टिळक वाचनालय व हुतात्मा स्मारक वाचनालय ईथे राबविले या वाचन उपक्रमाला दोन्ही वाचनालयात 35 ते 40 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला