आम आदमी पक्षाच्या शिष्टमंडळाने, राज्यसरकारने केलेल्या विद्युत दरवाढीच्या विरोधात तहसीलदार विनोद मेश्राम यांना भेटून निवेदन (ता.13) सादर केलं.हे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवून त्वरीत वीज दरवाढ मागे घेवून महाराष्ट्रातील जनतेला दिलासा देण्याची मागणी केली.दरम्यान शिवसेनेच्या वचन नाम्या प्रमाणे 300 युनीट विद्युत रिडींगवर 30 टक्के दर कमी करणे आणि 200 युनीट मोफत देणेआदि मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. निवेदन देते वेळी आम आदमी पार्टीचे तालूका संयोजक कैलाश नंदेश्वर, सचीव गणेश द्रुगकर , कोषाध्यक्ष नरेश आदमने,, प्रचार प्रमुख मोरेश्वर नंदेश्वर, किसान आघाडी प्रमुख, रत्नघोष गजघाटे, आदिवासी आघाडी सेलचे हरी भाऊ नैताम,पंचायत समिती झाशीनगर गणाचे विभाग प्रमुख विलास राऊत,, उपाध्यक्ष नितीन नांदगावे . पवनी धाबे ग्राम समीती अध्यक्ष बबलु भाऊ कोरेटी, मनोहर जी टेंभुरने. गणेश कवडो,युवा अध्यक्ष गणेश राणे .येलोडीचे ग्रामिण अध्यक्ष ताराचंद गेडाम , व्यापारी सेलचे रामकृष्ण कोल्हे व तालुका संघटन मंत्री बी. शैलेंद्र आदी कार्यकर्ते ऊपस्थीत होते.