वाशिम : विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील लोकांकरीता वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या वतीने वैयक्तीक व्याज परतावा योजना बँकेमार्फत 1 लक्ष रुपये ते 10 लक्ष रुपयापर्यंत व त्यावर आकारण्यात येणारे व्याज १२ टक्यापर्यंत महामंडळाकडून देण्यात येते.गट कर्ज व्याज परतावा योजना या दोन योजना १० लक्ष रुपये ते ५० लक्ष रुपयापर्यंत व त्यावर आकारण्यात येणारे व्याज १२ टक्यापर्यंत महामंडळाकडून देण्यात येते.या योजना ऑनलाईन राबविल्या जातात. याबाबतची सर्व माहिती महामंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
बिज भांडवल कर्ज योजना २५ टक्के महामंडळ व ७५ टक्के बँक कर्ज,थेट कर्ज योजना ऑफलाईन असून थेट कर्ज योजनेची अर्ज विक्री जिल्हा कार्यालयात सुरू करण्यात आली आहे.कर्ज योजनेचे अर्ज घेताना आधारकार्ड,जातीचा दाखला व राशन कार्ड सोबत ठेवणे आवश्यक आहे.ज्या अर्जदाराने व्यवसायासंबंधीत प्रशिक्षण घेतले आहे,त्यांना व विधवा निराधार महीलांना प्राधान्य देण्यात येईल. योजनेच्या लाभासाठी डॉ. बाबासाहेब आंबडेकर,सामाजिक न्याय भवन, चिखली रोड, वाशिम येथे प्रत्यक्ष व अधिक माहितीसाठी 7276941515 व 8668543879 या क्रमांकावर संपर्क साधावा.कर्ज मागणी अर्ज फक्त अर्जदारास विक्री व त्याच्याकडूनच स्वीकारल्या जातील.इतर कोणत्याही व्यक्तीस अर्ज विक्री केला जाणार नाही व स्वीकारल्या जाणार नाही.असे वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एच.जी.आत्राम यांनी कळविले आहे.