वाशिम : वय ६५ वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरीकांना त्यांच्या दैनदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणारे दिव्यांगत्व , अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय साधने / उपकरणे खरेदी करणेकरीता तसेच मनःस्वास्थ केंद्र , योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्य अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यास मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे . त्याअनुषंगाने ६५ वर्ष वय व त्यावरील त्यावरील ज्येष्ठ नागरीकांना त्यांच्या दैनदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणारे दिव्यांगत्व , अशक्तपणा यावार उपाययोजना करण्यासाठी त्यांच्या शारीरिक असमर्थता / दुर्बलतेनूसार चष्मा श्रवणयंत्र , ट्रायपॉड स्टिक , कोल चेअर , फोल्डोग वॉकर , कमोड खुर्ची , निस , लंबर बेल्ट , सवाईकल कॉलर इत्यादी सहायभूत आवश्यक सहाय साधने / उपकरणे खरेदी करणेकरीता तसेच मनःस्वास्थ केंद्र योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजनेंतर्गत लाभार्थांना लाभ देण्यात येतो . सदर योजनेकरीता नवीन स्वतंत्र पोर्टल कार्यान्वित होईपर्यंत या योजनेंतर्गत निधीचे वितरण पात्र लाभार्थ्यांच्या वैयक्तिक आधार संलग्न बँकेच्या बचत खात्यात एकवेळ एकरकमी ऑनलाईन पध्दतीने करण्याऐवजी निधीचे वितरण पात्र लाभार्थ्यांना थेट धनादेशाद्वारे एकवेळ एकरकमी रु .३ हजारच्या मर्यादित ऑफलाईन पध्दतीने वितरीत करण्यास शासनाने मान्यता प्रदान केलेली आहे . लाभार्थानी अर्जासोबत जोडवयाची कागदपत्रे आधार कार्ड/मतदान कार्ड,राष्ट्रीकृत बॅकेची पासबुक झेराक्स,पासपोर्ट आकारचे दोन फोटो,स्वयं-घोषणापत्र, शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहीत केलेली अन्य कागदपत्रे , आरोग्य प्रमाणपत्र ,उत्पन्नाचा दाखला , समकक्ष योजनेचा लाभ घेतला नसल्याचे स्वंयघोषणापत्र, बि.पी.एल कार्ड झेराक्स इत्यादी आवश्यक कागदपत्रासह सहाय्यक आयुक्त समाज कल्याण वाशिम यांच्या कार्यालयास अर्ज सादर करावे असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, वाशिम यांनी कळविले आहे