पोलिस स्टेशन वरोरा येथे आज दिनांक 8 मार्च 2023 रोजी मा. सहायक पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी वरोरा यांचे उपस्थितीत व मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अमोल काचोरे पोलिस स्टेशन वरोरा नी पोलीस स्टेशन वरोरा येथे जागतिक महिला दिनानिमित्त आज रोजी पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी पदाचा कार्यभार महीला पोलिस उप निरीक्षक वर्षा तांदुळकर यांना ठाणे प्रभारी अधिकारी पदी नियुक्त करून सन्मानित करण्यात आले व आजचे प्रभारी अधिकारी यांचे उपस्थितीत पोलिस स्टेशन वरोरा येथे 12.30 वा. पासुन ते 13.30 वा. पावेतो जागतिक महीला दिना निमित्त सर्व महिला पोलिस अमलदार तसेच ईतर सामाजिक क्षेत्रातील महीला यांना मान्यवर तर्फे पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. उपस्थित सामाजिक क्षेत्रातील महीला, पत्रकार बंधू तसेच ईतर मान्यवर यांचे समक्ष महिला पदाधिकारी व अमलदार यांना आपले कर्तव्य पार पाडताना येणाऱ्या समस्या बाबत चर्चा करून समस्या समजावून घेतल्या व उचित मार्गदर्शन करून जागतिक महीला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान महिला दिन जागतिक स्तरावर कसे अमलात आले याबाबत माहिती देऊन महिलांच्या दिन कार्यात कशा अडचणी राहतात व सदर अडचणीवर महिला कशा मात देऊन आपले कर्तव्य योग्य रीता कश्या पार पाडतात याबाबत उपस्थित मान्यवर मंडळी व सत्कार मूर्ती महिला यांना सांगून सदर कार्यक्रम पार पाडण्यात आला.
यावेळी पोलिस स्टेशन वरोरा हद्दीतील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिला, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार बंधू व ईतर मान्यवर तसेच पोलिस स्टेशन वरोरा येथील पोलिस अधिकारी व अमलदार उपस्थित होते.