कारंजा : येथील दैनिक मातृभूमीचे तालुका प्रतिनिधी समीर देशपांडे यांची कन्या कुमारी अनुश्री हिने दहावीच्या परीक्षेत 94% गुण घेऊन प्रावीण्य श्रेणीत शालांत परीक्षा उत्तिर्ण केली. कुमारी अनुश्री देशपांडे कंकुबाई गर्ल्स हायस्कूल कारंजा येथील विद्यार्थीनी असून तिने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील तसेच शाळेचे सचिव संजीव रुईवाले यांना दिले आहे. युवाक्रांती समाचार परिवारातर्फे वाशिम जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे यांनी तीचे कौतूक करीत तीला पुढील शैक्षणिक वाटचालीकरीता अभिनंदन व शुभेच्छा दिल्या आहेत.