पुणे दि छत्रपती संभाजी महाराज यांचे वर सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करणारे आणि अत्यंत जवळचे विश्वासू समजणारे सेवक व नाशिक येथील रामशेज किल्ल्याचे किल्लेदार विरयोध्दा गोविंद गोपाल गायकवाड यांचे १३ वे वंशज असलेले आणि भीमा कोरेगाव येथील झालेल्या लढाईमध्ये पेशवे शाहीला संपवुन शौर्य प्राप्त करणारे संघर्षविर शिदनाक(महार) इनामदार यांच्या वंशजाचे जावाई असलेले आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे उद्योजक दिवंगत राजेंद्रजी शंकरराव गायकवाड यांच्या ६० व्या जयंती दिनानिमित्त दिवंगत राजेंद्रजी शंकरराव गायकवाड यांची प्रथम जयंती बहुजन जनता दलाच्या वतीने साजरी करण्यात आली आहे.
दिवंगत राजेंद्रजी शंकरराव गायकवाड यांच्या जयंती दिनानिमित्त त्यांना बहुजन जनता दलाच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी दिवंगत राजेंद्र शंकरराव गायकवाड यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व नतमस्तक होऊन अभिवादन केले यावेळी श्रीमती अहिल्याताई राजेंद्रजी गायकवाड सुरेश गायकवाड रमेश गायकवाड कैलास गायकवाड पांडुरंग गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते
दिवंगत राजेंद्रजी शंकरराव गायकवाड यांच्या जयंती दिनानिमित्त त्यांच्या कुटुंबाच्या वतीने पुणे शहराच्या विविध भागातील गोरगरिबांनी आणि गरजू नागरिकांना युवराज जयेश राजेंद्र गायकवाड यांच्या हस्ते अन्न आणि वस्त्र व भोजनदान देण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन सुरेश गायकवाड यांनी केले यावेळी गायकवाड कुटुंबातील अनेक सदस्य आणि बहुजन जनता दलाचे कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थितीत होते