जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यात बॅटरी चोरणारी टोळी सक्रिय आहे. पोलिसांनी त्यांचा शोध घेण्याची गरज आहे. मोठ्या वाहनांची बॅटरी सात ते आठ हजार रुपयांची राहते. सदर बॅटरी वाहनाला लागून असतानाच चोरटे अलगदपणे ती वाहनातून बाहेर काढतात. त्यानंतर ती बॅटरी चोरी केली जाते. विशेष म्हणजे, बॅटरीचे वजन कमीत कमी दहा किलो एवढे असते. त्यामुळे एकट्या व्यक्तीला बॅटरी उचलून नेणे किंवा ती वाहनातून काढणे शक्य होत नाही. यासाठी दोन ते तीन व्यक्तीची गरज राहते. त्यामुळे बॅटरी चोरणाऱ्यांची एक टोळीच असावी, अशी शंका उपस्थित केली जात आहे.