Qकारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे): गरजू नागरिकांपर्यंत सर्व शासकिय योजनांचा लाभ, त्वरीत एकाच छताखाली मिळण्याचे उद्देशाने कारंजा येथील शासकिय यंत्रणेच्या वतीने,शनिवार दि. I5 जुलै 2023 रोजी "शासन आपल्या दारी" हा कार्यक्रम स्थानिक देशमुख मंगलम् कार्यालय, मुर्तिजापूर रोड,कारंजा येथे घेण्यात आला.सदरहु कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी, कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाचे भाजपा आमदार, मा.राजेंद्र पाटणी होते.तर प्रमुख अतिथी म्हणून,उपविभागीय अधिकारी मा. ललितकुमार वऱ्हाडे,तहसिलदार मा.कुणाल झाल्टे,विशेष अतिथी जि.प.समाज कल्याण सभापती अशोकजी डोंगरदिवे,जि.प.महिला बालकल्याण सभापती श्रीमती वैशालीताई लळे,पंचायत समिती सभापती छोटूबाप्पू देशमुख,उपसभापती अंबरकर, गटविकास अधिकारी प्रफुल तोटेवाड,नगर पालिका मुख्याधिकारी दिपक मोरे, तालुका आरोग्य अधिकारी नांदे, कृषी अधिकारी जटाळे,ज्ञायक पाटणी, भाजपा तालुकाध्यक्ष डॉ राजीव काळे,भाजपा शहर अध्यक्ष ललित चांडक, गुड्डू पाटील कानकिरड,प्रमोद लळे, राजीव भेंडे,संकेत नाखले, आमदारांचे स्विय सहाय्यक संजय भेंडे इ उपस्थित होते.तसेच तलाठी अमोल वक्ते,धानोरकर, सर्व मंडल अधिकारी, तलाठी कोतवाल आणि इतर सर्वच शासकिय महसूल,आरोग्य,कृषी, पंचायत समिती व नगर पालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.शिवाय तालुक्यातील विविध योजनांच्या लाभार्थींची उपस्थिती उल्लेखनिय अशी होती.

शासनाच्या या कार्यक्रमात, कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार राजेंद्र पाटणी आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लाभार्थांना, टॅक्टर,विविध प्रमाणपत्र, किट, आयुष्पमान भारत कार्ड, गोल्डन कार्ड व विविध दाखल्यांचे प्रतिनिधीक स्वरूपात वितरण करण्यात येवून, प.स. विभागवार, नगर परिषद विभागवार, महसूल, कृषी, आरोग्य विभागाच्या एकूण सहा हजार एकशे अठ्ठावीस लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ देण्यात आले. यावेळी रक्तदान शिबीर सुद्धा घेण्यात आले.
उपविभागीय अधिकारी मा. ललितकुमार वऱ्हाडे यांनी विशेष मार्गदर्शन केले,तहसिलदार कुणाल झाल्टे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन तलाठी राहुल वरघट यांनी आणि आभार प्रदर्शन,नायब तहसिलदार विकास शिंदे यांनी केले.शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता,तालुक्यतील सर्व कार्यालयीन विभागाच्या अधिकारी कर्मचार्यांचे अथक सहकार्य मिळाले.असे वृत्त, महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेला प्रसिद्धी पत्रकाद्वारे तहसिल कार्यालयामार्फत मिळाल्याचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी कळविले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....