वाशिम : सार्वत्रिक निवडणूकीच्या काळात समाजातील विविध जातीधर्मातील संस्था संघटनेच्या नेते,पुढारी आणि कार्यकर्त्याचे पेव फुटून हे तथाकथीत नेते निवडणूकीच्या रिंगणातील उमेद्वाराचे एजंट म्हणजेच दलाल म्हणून कार्यरत होऊन तळागाळातील समाज व आपल्या जाती धर्माचे मतदार आपल्याच पाठीशी असून, आपण सांगू त्याच उमेद्वाराला मतदान करणार असल्याच्या फुशारक्या मारून वेळप्रसंगी समाजातील त्यांच्या जातीधर्माची संख्या उमेद्वारांना दाखवून किंवा आपआपल्या गावखेडे, वाड्या वस्त्या, वार्डातील मतदार आपल्या शब्दा पलीकडे नसून, आपण सांगू त्याच उमेद्वाराला निवडणूकीमध्ये मतदान करणार असल्याच्या बढाई मारून, निवडणूक रिंगणातील उमेद्वाराकडून मतदारांना मतासाठी पैसे वाटण्याच्या नावावर,उमेद्वाराकडून करोडो रुपयाची माया गोळा करून, मतदाराच्या हातावर तुरी ठेवत असतात.यामध्ये अशी तथाकथीत पुढारी दलाल मंडळी उमेद्वार आणि मतदार दोहोंचीही फसवणूक करीत असतात. त्यामुळे कृपा करून निवडणूकीच्या काळात कोणत्याही मिथ्या आश्वासनाला बळी पडू नका. उमेद्वाराच्या जेवणावळी,मटणपार्टी, दारूपार्टी मध्ये सहभागी होऊ नका. चारपाचशे रुपयांमध्ये आपले अमूल्य मत चुकीच्या उमेद्वाराला देऊ नका. "भारतिय लोकशाही मध्ये मतदार हा तळागाळातील गरीबातील गरीब किंवा ग्रामिण भागातील असला तरीसुद्धा तो मतदार राजा आहे. व त्याने स्वाभिमान बाळगून आपल्या मता बद्दल कोणताही चिल्लर मोबदला न घेता, कोणत्याही नेत्याच्या दबावाखाली न येता निवडणुकीच्या दिवशी निर्भिडपणे मतदान केन्द्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे व योग्य उमेद्वाराला लोकसभा किंवा विधानसभेत पाठवीले पाहिजे." असे आवाहन दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी केले आहे.