ब्रम्हपुरी/प्रतिनिधी:- ब्रम्हपुरी तालुक्यातील चिंचोली (बुज.) येथे अल्हाज हरजत सैय्यद मोहम्मद ईकबालशाह बाबा उर्फ बाबाजान कादरी चिस्ती चिंचोली (बुज.) उर्स मुबारक निमित्य अम्मासाहेबा व शफीबाबा, शरीफबाबा व यांच्या मार्गदर्शनात माजी कॅबिनेट मंत्री तथा आमदार विजयभाऊ वडेट्टीवार साहेब यांच्या शुभहस्ते _गोवर्धन दोनाडकर_ पत्रकार देशोन्नती तथा सचिव तालुका पत्रकार संघ ब्रम्हपुरी यांचे दरबारी जाहीर सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार मनोहर चंद्रिकापुरे अर्जुनी (मो.), माजी आमदार नामदेव उसेडी गडचिरोली, जेसाभाऊ मोटवाणी माजी नगराध्यक्ष वडसा, तुषारभाऊ सोम, विनोद संकत, रफिक खान ,खेमराज तिडके तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी, प्रभाकर सेलोकर कार्याध्यक्ष काँग्रेस कमिटी ब्रम्हपुरी, दिवाकर निकुरे जिल्हाध्यक्ष ओबीसी विभाग काँग्रेस कमिटी चंद्रपूर, समितीचे अध्यक्ष मोहनजी गिरी, सचिव अरविंद जयस्वाल व अन्य मान्यवर उपस्थित होते. गोवर्धनभाऊ दोनाडकर यांचे दरबारात जाहीर सत्कार केल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे .