कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) आदिगुंज बहुउद्देशीय संस्था व द्वारकामाई संगीत महेफिल यांच्या संयुक्त विद्यमाने,स्थानिक महात्मा फुले नगर येथील तुकारामजी खंडारे यांच्या निवासस्थानी, लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.यावेळी सर्वप्रथम द्वारकामाई संगीत महेफिलचे अध्यक्ष डॉ.कुंदन श्यामसुंदर यांचे हस्ते डॉ. अण्णाभाऊ साठ यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले. सोबतच समतादूत बार्टी,प्रणिताताई दसरे व सौ. सुधाताई खंडारे यांचे हस्ते सुध्दा हारार्पण करण्यात आले. द्वारकामाई संगीत महेफिलचे उपाध्यक्ष देविदास नांदेकर महेंद खरंतडे ,ज्ञानेश्वर खंडारे, सौ वंदना खंडारे,शिवाजीरावं गायकवाड, गुंजन खंडारे,आदित्य खंडारे, अर्णव खंडारे इत्यादी उपस्थित होते.प्रणिता दसरे व डॉ श्यामसुंदर यांनी आपल्या संभाषणातून डॉ.अण्णाभाऊ साठे यांचा जीवन चरित्राचा परिचय करून दिला. ज्ञानेश्वर खंडारे यांनी सूत्रसंचालन केले.तर देविदास नांदेकर यांनी आभार मानले.