वाशिम : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडून सन 1954-55 पासून राज्यातील वयोवृद्ध साहित्यीक, कलाकार,लोककलावंत यांच्या सन्मानार्थ त्यांना,राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यीक लोककलावंत यांना दरमहा मानधन देण्यात येते.आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात नव्या जुन्या एकूण 34724 कलावंतांना मानधन देण्यात येत होते.परंतु यापुढे शासनाने सर्व मानधन लाभार्थी यांची यादी आधारकार्ड आणि मोबाईल नंबर अद्यावत करून सांस्कृतिक कार्य संचालनालयाद्वारे,माहिती महा आय.टी. विकासात्मक संस्थेला उपलब्ध करून देण्याचे ठरवीले आहे.जेणे करून माहे मे 2024 या चालू महिन्या पासूनचे पाच हजार रुपये मानधन दरमहा प्रत्यक्ष लाभहस्तांतरण ( डीबीटी ) मार्फत लाभार्थ्याच्या बँक खात्यात वळते करण्यात येईल.त्याकरीता सांस्कृतिक कार्य संचनालयाने राज्याच्या प्रत्येक जिल्ह्याच्या समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद कार्यालयामार्फत राज्यातील लाभार्थी कलावंताची आधार कार्ड माहिती मागीतली होती.पैकी आजपर्यंत 20,000 लोक कलावंताची आधार कार्ड माहिती त्यांचे कडे उपलब्ध झालेली होती. परंतु उर्वरीत 14,724 लाभार्थी लोककलावंताची आधारकार्ड प्रमाणिकरणाची माहितीच शासनाला उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे हे लाभार्थी हयात आहेत किंवा नाही.तसेच गरजू आहेत किंवा नाही याचा बोध होत नाही. त्यामुळे आधार कार्ड अद्यावत करून प्रमाणिकरण करून त्याची संपूर्ण माहिती शासनाला सर्व लोककलावंतानी तात्काळ उपलब्ध करून द्यावी.अन्यथा त्यांना माहे मे 2024 चे व त्यापुढील देय असलेले दरमहा पाच हजार रुपये मानधन बंद करण्यात येईल.अशी माहिती सांस्कृतिक कार्य संचनालयाच्या पत्र क्रं सां.का.स./संकिर्ण - 2024 / मानधन / 2462 दिनांक 02 मे 2024 च्या पत्रानुसार राज्यातील सर्व जिल्हा परिषद यांना कळविण्यात आलेली असल्यामुळे प्राप्त माहिती नुसार विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा कडून राज्यातील सर्व लाभार्थी लोक कलावंताना कळविण्यात येते की "त्यांनी आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करून घेऊन,जवळच्या महा ई सेवा केन्द्रात किंवा सेतू केन्द्रात जाऊन ऑनलाईन पद्धतीने कॉम्प्युटरद्वारे लिंक : https//mahakalasanman.org/ AadharVerification.aspx या लिंकवर क्लिक करून आपल्या आधार क्रमांक व मुख्य म्हणजे वारसदाराची नोंद करून पडताळणी करून घ्यावी.व तसी माहिती आपल्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद समाज कल्याण विभागातील राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यीक कलाकार मानधन लाभार्थीचे कामकाज पहाणाऱ्या संबंधित अधिकारी यांना तात्काळ द्यावी." वाशिम जिल्ह्यातील लाभार्थी लोक कलावंतानी आपली माहिती श्री दिनेश लहाडके बाबू ( वरिष्ठ सहाय्यक),समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद वाशिम यांना द्यावी.असे आवाहन महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त,विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी केले आहे. असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे त्यांनी कळवीले.