वाशिम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : वाशिम येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या शैक्षणिक वर्ष सन 2009-10 पासून ते 2013-14 पर्यंतच्या माजी मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी भारत सरकार शिष्यवृत्तीचा, फ्रिशिप व विद्यावेतनचा अर्ज सादर केला होता व शिष्यवृत्ती, फिशिप व विद्यावेतनची रक्कम घेऊन गेलेले नाही, अशा विद्यार्थ्यांनी ही रक्कम संस्थेतून 30 दिवसाच्या आत रोखपाल, शासकीय तंत्रनिकेतन, वाशिम यांचेकडे विहीत नमुन्यातील पावती सादर करुन रक्कम प्राप्त करुन घ्यावी. विहीत मुदतीत विद्यार्थ्यांनी भारत सरकार शिष्यवृत्ती, फ्रिशिप व विद्यावेतनची रक्कम घेऊन न गेल्यास त्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची राहील अन्यथा ही रक्कम शासन जमा करण्यात येईल. असे प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, वाशिम यांनी कळविले आहे.