सर्वांशी मिळून मिसळून वागत, पत्रकारांसह कलावंताची मने जिंकणाऱ्या हजरजबाबी व कर्तव्यदक्ष अशा जिल्हा माहिती अधिकारी, विवेकजी खडसे सर, यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधीत, मंगळवारी वाशिम जिल्ह्यासह कारंजा [लाड] येथील विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा आणि महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी, वाशिम येथील जिल्हा माहिती अधिकारी यांच्या शासकिय कार्यालयात लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष तथा साप्ताहिक करंजमहात्म्यचे संपादक संजय कडोळे यांचे नेतृत्वात जाऊन, जि . मा .अ. विवेकजी खडसे यांना पुष्पगुच्छ देऊन हार्दिक अभिनंदन करीत त्यांना दिर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या .