चंद्रपूर :- आयटकसह देशातील केंद्रीय कामगार कर्मचारी संघटना राज्य सरकारी - निमसरकारी कर्मचारी सह इतरही कामगार कर्मचारी कृती समित्यानी ९ अॉगस्ट क्रांतीदिनी पुकारलेल्या देशव्यापी आंदोलनाची हाकेवरून संघटीत व असंघटित कामगार कर्मचारी यांनी ९ ऑगस्ट रोजी मा.जिल्हाधिकारी चंद्रपूर कार्यालयावर धडक देत तीव्र निदर्शने करत कामगार,किसान विरोधी मोदी सरकार चले जाव च्या घोषणा केल्या व त्या नंतर शिष्टमंडळाने मा.जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन चर्चा करून त्यांचे मार्फत मा. पंतप्रधान,भारत सरकार ,व मा. मुख्य मंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई यांना मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले आयटक चे निवेदनात म्हटले आहे महाराष्ट्र राज्यातील संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगार-कर्मचाऱ्यांच्या वतीने आम्ही खालील मागण्या आपणाकडे सादर करीत आहोत. सदर मागण्यांची आपण तातडीने पूर्तता करावी अन्यथा आपल्या सरकारच्या कामगार-कर्मचारी विरोधी, जनविरोधी व देश विरोधी धोरणाच्या विरोधात राज्यस्तरावर व राष्ट्रीय स्तरावर तीव्र स्वरूपाचे प्रदीर्घ आंदोलन केले जाईल असा इशारा आज एल्गार आंदोलनांतुन केंद्र व राज्य सरकारला देण्यात आला आहे तसेच श्रमिकांच्या विरोधात धोरणे अंमलात आणत असल्यामुळे पुढील काळात येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये अशा धोरणांचा पराभव करण्यासाठी आम्ही कार्यरत राहू.असेही म्हटले आहे मागण्या कामगार कर्मचारी विरोधी चार श्रमसंहिता रद्द करा., केंद्र सरकारचे राष्ट्रीय संपत्ती व सार्वजनिक उद्योग व सेवांचे खाजगीकरण व विक्री करण्याचे धोरण मागे घ्या.,नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईनचे धोरण रद्द करा., शासकीय, निमशासकीय विभाग, नगरपालिका, महापालिका व खाजगी उद्योग व आस्थापनांमध्ये हंगामी, कंत्राटी, रोजंदारी व मानधनावरील अंगणवाडी,गटप्रवर्तक, आशा, शालेय पोषण कर्मचारी , कंत्राटी नर्सेस,अंशकालीन स्त्री-परिचर इत्यादी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कामगार-कर्मचाऱ्यांना कायम करा.व कायम करेपर्यंत त्यांना दरमहा किमान वेतन रू.२६०००/- मानधन वेतन द्या,महाराष्ट्र शासनाचा आऊट सोर्सिंगद्वारे नोकर भरती करण्याचा शासन निर्णय रद्द करा., कामगार विषयक त्रिपक्षीय समित्या व विविध मंडळावर कामगार संघटनांचे प्रतिनिधी घ्या.,आठ तासाच्या कामासाठी दरमहा २६ हजार रुपये किमान वेतन निश्चित करा.,असंघटित क्षेत्रातील कामगारांना सेवा शर्ती व पेन्शन, विमा, इत्यादी सामाजिक सुरक्षा लागू करण्यासाठी माथाडीचे धरतीवर कल्याणकारी मंडळ स्थापन करा व योजनांसाठी निधीची तरतूद करा.,सर्व नागरिकांना ( ईपीएफ पेन्शनधारकांसह) दरमहा दहा हजार रुपये किमान पेन्शन लागू करा. व सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा.,महागाई रोखा, सार्वजनिक वितरण व्यवस्था मजबूत करा, रोजगार निर्माण करण्यासाठी योजना आखा, बेरोजगारांना बेरोजगार भत्ता द्या,गरीब व मध्यम शेतकरी आणि शेतमजुरांचे संपूर्ण कर्ज माफ करा., ग्रामीण व शहरी भागात दरवर्षी २०० दिवस रोजगार हमी मार्फत काम द्या व प्रतिदिन ६००/-रुपये मजुरी द्या., महाराष्ट्र राज्य घरेलु कामगार (मोलकरीण मंडळाची तात्काळ उभारणी करा, विज कंपन्याचे खाजगी करन करू नका, सर्व विज कंत्राटी कामगारांना उर्जा उद्योगात कायम करा, उमेद अंतर्गत काम करणाऱ्या वर्धनी, आरोग्य सखी,आर्थीक सखी, साक्षरता सखी ,बॅंक सखी, उद्योग सखी, पशु सखी, कृषी सखी, मस्त्य सखी,पेरीका सखी, कर्मचाऱ्यांना नियमीत रोजगार उपलब्ध करून द्या, त्यांना किमान वेतन द्या यावेळी कॉ.विनोद झोडगे राज्य सचिव आयटक , कॉ.एन. टी.म्हस्के , कॉ.प्रदीप चिताडे संयुक्त खदान मजदुर संघ , कॉ.रवींद्र उमाटे, कॉ.राजू गैनवार , कॉ.क्यापटन भारतीय कम्युनिस्ट पक्ष, कॉ.प्रकाश रेड्डी किसान सभा, कॉ.निकीता निर जिल्हा सचिव , कॉ.सविता गठलेवार शहर सचिव,कॉ.फर्जणा शेख,ममता भिमटे अध्यक्ष आशा वर्कर व गट प्रवर्तक संघटना ,सुषमा शिरभाये,ललिता मुत्यालवार,अमिता नागदेवते कंत्राटी नर्सेस युनियन यांच्या सह जिल्हा भरातील शेकडो महीला उपस्तीत होत्या.
वरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रकाशित कराल ही विनंती.
दि.11 ऑगस्ट 2023
आपला
कॉ. विनोद झोडगे जिल्हा सचिव आयटक चंद्रपूर
आपल्या प्रतिक्रिया द्या....