अकोला : स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला व जे सी आय न्यू प्रियदर्शनीच्या माध्यमाने डॉ.विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात दिव्यांग रोजगारासाठी अकोल्यातील *माहेश्वरी भवन अकोला येथे दि.१७ व १८ ऑगस्ट २०२५ रोजी विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रदर्शनात दिव्यांग बांधवांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे भव्य दालन आयोजन समितीतर्फे उपलब्ध केले आहे. दिव्यांग रोजगार निर्मितीसाठी संस्थेतर्फे संपूर्ण भारतात अशा प्रदर्शनाचे आयोजन केले जात आहे . *गणेश उत्सव , नवरात्री , दसरा व दिवाळीसाठी विविध पूजा साहित्य लोकरीचे कलात्मक साहित्य व शोभिवंत वस्तू निर्मिती करून दिव्यांगांना रोजगार देण्याचा हा अकोल्यातील पहिलाच उपक्रम आहे*. अकोल्यातील विविध सामाजिक संस्था व महिला मंडळा द्वारा या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला जात आहे . *दिव्यांग बांधवांच्या शिक्षण, रोजगार व आरोग्यासाठी संस्था उत्कृष्ट कार्य करीत असून आम्ही या संस्थेला पुढे नेण्यासाठी कार्य करू अशी माहिती आयोजन समितीच्या आरती पणपालिया यांनी दिली. दिव्यांग बांधवांनी रोजगारासाठी संस्थेसोबत एकत्रित येऊन कार्य करावे अधिक माहितीकरिता संस्थेच्या ९४२३६५००९० या हेल्पलाइन क्रमांका वर नोंदणी करावी असे आव्हान संस्थापक अध्यक्ष डॉ. विशाल कोरडे यांनी केले आहे. सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या या प्रदर्शनीला यशस्वी करण्यासाठी शारदा लखोटिया , सिंधू पवार , स्वाती राठी , मीना टावरी , मोनिका राठी , प्रेरणा चांडक , तन्वी दळवे , अस्मिता मिश्रा , अनामिका देशपांडे , अनुराधा साठे व नेहा पलन यांचे सहकार्य लाभत आहे.