कारंजा लाड: ब्रम्हाकुमारीज मुख्यालय माऊंट आबूच्या माजी मुख्य प्रशासिका दिवंगत राजयोगीनी ब्र.कु. प्रकाशमणी दादीजी यांचे पुण्यस्मरणाचा दिन ब्रम्हाकुमारीज कडून 'विश्व बंधुत्व दिन' म्हणून साजरा केल्या जातो. त्या निमित्ताने, यंदाचे अठरावे पुण्यस्मरणाला ब्रम्हाकुमारीजने, आपल्या देशात व नेपाळसह इतरही सर्वच केन्द्राद्वारे मानव सेवेकरीता एक लाख युनिट रक्त संकलन करून गिनीज बुक ऑफ रेकॉर्डचा संकल्प केला होता.त्यामुळे कारंजा (लाड) येथील पुरातन ब्रम्हाकुमारीज केन्द्राद्वारे रक्तसंकलनाचा निर्णय, कारंजा केन्द्राच्या मुख्य संचालिका राजयोगीनी ब्र.कु. मालतीदीदी यांनी घेतला होता. त्यानुसार कारंजा येथील 'प्रभुमीलन' केंद्रावर, केंद्राच्या प्रमुख संचालीका राजयोगीनी मालती दिदि; संयोजक डॉ . निखील भाई कटारीया यांच्या पुढाकारात रक्तदात्यांनी रक्तदान करुन माऊंट आबूच्या मुख्य प्रशासीका स्व. ब्र.कु .प्रकाशमणी दादी यांना अभिवादन केले.
रक्त संकलनाकरीता जिल्हा शासकीय रुग्नालय वाशीमचे पथक उपस्थित होते. रक्तदान शिबीर उद्घाटन प्रसंगी भारत गॅसचे संचालक शेखर बंग; डॉ . सुशील देशपांडे; राज्यशासन पुरस्कार प्राप्त माजी प्राचार्य अशोकराव उपाध्ये; महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त असलेले साप्ताहिक करंजमहात्म वृत्तपत्राचे संपादक संजयजी कडोळे; खेर्डा कारंजाचे माजी सरपंच बी.के. प्रदीपभाई वानखडे; पोलीस पाटील दिलीप भाई ताठे; कृउबा समितीचे अडतदार इश्वर ताठे; संयोजक डॉ निखील कटारीया; प्रवीण भाई; गोपाल मुदगल,वाशिम शासकीय रक्तपेढीचे डॉ अनुराधा डागरीया; संदीप मोरे; गणेश वैद्य; प्रियंका सावंत राजकुमार पवार; अंकूश अंभोरे किरण बोरकर शितल मापारी आकाश राठोड; अतुल पटटेबहादूर इत्यादीची उपस्थीती होती. सर्वप्रथम राजयोगीनी स्व. प्रकाशमणी दादी यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी आपल्या संभाषणातून बोलतांना राजयोगीनी ब्र.कु. मालती दिदी यांनी, "मानवसेवेसाठी रक्तदानासारखे श्रेष्ठदान नाही.असे मार्गदर्शन करतांना ब्रम्हाकुमारीजकडून संपूर्ण देशात प्रत्येक केंद्रावर दि.२२ ते २५ ऑगष्ट दरम्यान रक्तदान शिबीर होत असल्याचे सांगून एक लाख युनिटपेक्षा जास्त रक्त संकलीत करून 'गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड' मध्ये ब्रम्हकुमारीजच्या सामाजीक कार्याची नोंद होत असतांना कारंजा केन्द्राचा हातभार लागणार असल्याचे मत व्यक्त केले.या प्रसंगी ब्रम्हाकुमारीज परीवार व सहयोगी तरुणाईच्या पुढाकारात कारंजा येथील शिबीरात रक्तदात्यांनी रक्त देऊन सहकार्य केले. सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र व बाबाची सौगात, पुष्पगुच्छ देऊन गौरवीण्यात आले. रक्तदान शिबीर यशस्वी करण्यास कारंजा ब्रम्हाकुमारीज केंद्राकडून यशस्वी प्रयत्न झाले. राजयोगीनी ब्र.कु.मालती दिदिंनी सर्वाचे आभार मानले.असे वृत्त ब्रम्हाकुमारीज कारंजा केन्द्राचे प्रसिद्धी प्रमुख संजय कडोळे यांनी कळवीले.