ब्रम्हपूरी तालुक्यातील पाचगाव येथील कु. सुमीत संजय शिवूरकार (वय 12 वर्ष) हा मुलगा मागील काही महिन्यांपासून ह्दयरोगाच्या आजाराने ग्रस्त आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत. मात्र त्याचे वडील मजुरी करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने सदर मुलावर वैद्यकीय उपचार करतांना आर्थिक अडचण निर्माण होत आहे.
सदरची बाब पाचगाव येथील ग्राम काॅंग्रेस कमेटीच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे विरोधीपक्षनेता विजय वडेट्टीवार यांना कळवली असता त्यांनी तात्काळ आपल्या कार्यकर्त्यांच्या मार्फतीने आपल्याकडुन सदर मुलाच्या वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत पाठवली.
सदरची आर्थिक मदत देतांना तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, पाचगाव ग्राम काॅंग्रेस कमेटीचे अध्यक्ष तथा सरपंच मुकुंदा शिवुरकार, ग्रा.पं.सदस्य तथा से.स.संस्थेचे सदस्य उत्तम बनकर, माजी सरपंच देवचंद ठाकरे, काॅंग्रेस कार्यकर्ता गजानन भोयर, ग्रा.पं. सदस्य अज्ञान शिवुरकार, सुखदेव बनकर, जनसंपर्क अधिकारी सुधीर पंदीलवार, सोमेश्वर उपासे, राहुल मैंद हे उपस्थित होते.