श्री शिवाजी काॅलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी चे राष्ट्रीय सेवा योजना
अकोला --विवेकशील, विज्ञानाधिष्ठित, प्रागतीक भारतासाठी समाजातील अंधश्रद्धा समुळ नष्ट करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती चे राज्य सरचिटणीस बबनराव कानकिरड यांनी केले.
श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी च्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात कुंभारी येथे उद्बोधन प्रसंगी बोलत होते. श्री शिवाजी महाविद्यालयाचे वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.डॉ. संजय तिडके,प्रा.डॉ. ज्योती शेगोकार,प्रा. कपिल निळे, वृक्षमित्र एस. नाथन यांची प्रमुख उपस्थिती होती.
महाराष्ट्र अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. संजय तिडके यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी संत गाडगेबाबांनी दिलेले योगदान या विषयावर उद्बोधन केले व उपस्थित तरुणाईला अंनिस चळवळीत सामील होण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे संचालन कु. अनुश्री राठोड व कु. अंजली दांडगे यांनी केले यांनी केले. आभार प्रदर्शन कु.धनश्री गोतमारे यांनी केले.
प्रा.डाॅ. धर्मेंद्र कोठारी, प्रा. स्नेहा सोनवणे, वैशाली कातखेडे, अर्पित कोगदे, सौरभ अलोणे यांचे सह विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते. "विवेकाचा आवाज बुलंद करू या","एक बनो- एक बनो" या गर्जनेने कार्यक्रमाची सांगता झाली.