वन्यजीव सप्ताह २०२५ हा १ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर २०२५ या दरम्यान रामपूर चक येथे साजरा करण्यात आला. या सप्ताहाचे आयोजन वन्यजीवांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने करण्यात आले होते, ज्यामध्ये जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले गेले.
वनपरीक्षेत्र कार्यलय आरमोरी, उपक्षेत्र आरमोरी, नियतक्षेत्र आरमोरी अंतर्गत वनपरीक्षेत्र अधिकारी आरमोरी श्री कैलास धोंडने यांच्या मार्गदर्शनाखाली मौजा रामपूर चक येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामपूर येथे वन्यजीव सप्ताह 2025 निमित्त शाळेतील विध्यार्थी यांच्या सोबत भव्य रॅली काढण्यात आली. सदर रॅली मधून गावातील जनतेला वन्यजीव संरक्षण व संवर्धन करणे बाबत विद्यार्थी यांनी जोरदार घोषणा देऊन संदेश दिला.व विद्यार्थी यांना वनरक्षक रामाळा श्री ए व्ही साखरे, वनरक्षक आरमोरी श्री पी आर पाटील यांनी विविध प्राण्यांची ओळख व त्यांच्या विषयी माहिती दिली तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री गुळदे सर यांनी मुलांना वन्यप्राणी यांचे मानवी जीवनातील महत्व पटवून दिले. सदर कार्यक्रमासाठी गावातील प्रवीण ठेंगरी, सहशिक्षिका वाघाडे मॅडम, सहशिक्षिका मने मॅडम, वनकर्मचारी श्री पी आर पाटील, ए व्ही साखरे, कु नलिनी भर्रे, कु. स्मिता गोंगले, कु व्ही जी डोंगरे व गावातील प्रतिष्टीत नागरिक उपस्थित होते.