अकोला: स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या माध्यमाने संस्थापक अध्यक्ष डॉ.विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण भारतभर सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत.
24 तास कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांसोबत रक्षाबंधन साजरे करण्यासाठी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या दिव्यांग बांधवांनी तयार केलेल्या राख्या बांधून हा सामाजिक उपक्रम दिनांक 9 ऑगस्ट 2025 रोजी साजरा करण्यात आला* . दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या सदस्यांनी *जिल्हा स्त्री रुग्णालय, मुख्य पोस्ट कार्यालय, सिव्हिल लाईन पोलीस चौकी व अग्नी शामक दल येथे जाऊन उपस्थित कर्मचाऱ्यांना दिव्यांग बांधवांनी तयार केलेल्या राख्या बांधल्या.* संस्थेच्या दिव्यांग व्यक्तींनी तयार केलेली विविध उत्पादने भेट स्वरूपात देऊन त्यांचा उत्साह द्विगुणित केला.प्रत्येक कार्यालयातील कर्मचारी वर्गाशी संवाद साधून संस्थेतर्फे त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या या सर्व 24 तास कर्तव्यदक्ष असणाऱ्या कर्मचाऱ्यांना जनसामान्यांनी सहकार्य करावे असे आव्हान संस्थापक अध्यक्ष डॉ.विशाल कोरडे यांनी केले. *ज्या दिव्यांगांना संस्थेच्या सामाजिक उपक्रमात आपला सहभाग नोंदवायचा आहे त्यांनी संस्थेच्या ९४२३६५००९० या हेल्पलाइन क् क्रमांका वर संपर्क साधावा अशी माहिती अनामिका देशपांडे यांनी दिली* . या सामाजिक रक्षाबंधनाच्या यशस्वी आयोजनासाठी गणेश सोळंके, अस्मिता मिश्रा, तन्वी दळवे,नयना खोडे, विजय कोरडे, अनुराधा साठे, श्रीकांत राऊत व नेहा पलन यांनी सहकार्य केले .