महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषि अधिकारी कार्यालय नागभिड अतंर्गत कृषि तंत्रज्ञान यंत्रणा (आत्मा) व्दारा खरीप हंगामात दि 25 जून ते 1 जुलै 2022 या कालावधीत "कृषी संजीवनी सप्ताह " साजरा करण्यात येत आहे.
या अंतर्गत दि.28 जुन 2022 रोज मंगळवार ला किसान गोष्टी हा कार्यक्रम साई मंदिर सभागृह तळोधी(बा.)येथे आयोजित करण्यात आला. सर्वप्रथम कै.वसंतराव नाईक यांच्या फोटो ला माल्यर्पण करून कार्यक्रमची सुरवात करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक गायकवाड प्रगतशील शेतकरी, उदघाटक खोजराम मरसकोल्हे माजी जिल्हा परिषद सदस्य, प्रमुख पाहुणे शैलेश तिवारी, खोब्रागडे विस्तार अधिकारी पंचायत समिती नागभीड, डॉ नागदेवते कार्यक्रम समवन्यक कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही , कु पि.एस. शिंदे तालुका कृषी अधिकारी नागभीड, कु.येवले कृषी पर्यवेक्षक, संजय पाकमोडे कृषी पर्यवेक्षक उपस्थित असून कृषीसहायक सि.एस.दाडगे, यु.आर.मोहिते, वैभव गूडधे , निलेश घुगे, यांच्या द्वारे युरिया ब्रिकेट्स चा वापर, ऍझोला, दशपर्णी, जीवामृत तयार करणे व वापर, फळबाग लागवड, स्मार्ट, ई-पिक पाहणी, पीक संरक्षण, बीज प्रक्रिया या बाबत प्रात्यक्षिक करून माहिती आली.सदर कार्यक्रमाचे संचालन जितेद्रं कावळे (आत्मा.) बी.टी.एम. नागभीड, तर आभार प्रदर्शन ए.के.शिरसाट यांनी केले