वाशिम : करंजमहात्म्य परिवाराच्या तिन वर्षातील निरिक्षणानुसार,वाशिम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील ग्राम रुई (गोस्ता) येथील जिल्ह्याचे एकमेव हवामान अभ्यासक गोपाल विश्वनाथ गावंडे यांचे दरवर्षीचे अंदाज अचूक होत असल्याचे ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे दैवी शक्ती असल्याप्रमाणे गोपाल पाटील गावंडे हे पावसाचे अनुमान व तारखा दोन ते तिन महिने पूर्वीच घोषीत करीत असतात. व ही दैवी शक्ती नसून, पर्यावरणाच्या अभ्यासाअंती त्यांचे येणारे 'हवामान-अंदाज' असतात. आणि आज रोजी त्यांच्या अंदाजावर अवलंबून महाराष्ट्रातील शेकडो शेतकरी आपल्या शेत पिकाचे आणि शेतमालाच्या रक्षणाचे नियोजन करीत असतात.काही महिन्यापूर्वीच त्यांनी यावर्षी चांगला पाऊस होणार असून शेतीचे उत्पन्नही सरासरी पेक्षा जास्त होण्याची शक्यता वर्तवली होती. तसेच जूनच्या दि. १२ जून पासून पावसाला सुरुवात होणार असल्याचे सांगतानाच दि. १२ ते १७ जूनपर्यंत दररोज राज्याच्या काही जिल्ह्यात,भाग बदलवून विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस होणार असून,अनेक ठिकाणी विजा पडणार असल्याचे सांगून शेतकऱ्यांना सतर्क केले होते.तसेच आधीच्या दिवसात रिमझिम पावसाला सुरुवात होईल नंतर पावसाचे प्रमाण वाढत असल्याचे सांगतानाच जून महिन्यात पाऊस कमी होणार असून,जुलै महिन्यात मात्र सर्वदूर चांगला पाऊस होणार असल्याचे सांगीतले होते.त्यांच्या अंदाजाप्रमाणे गुरुवार दि.१२ जून पासून पावसाला प्रारंभ झाला असून राज्याच्या अनेक भागासह विदर्भ,वाशिम, अकोला,अमरावती,यवतमाळ, बुलडाणा जिल्ह्यातही वारे वादळासह दि १२ जून रोजी पाऊस झालेला आहे. या संदर्भात भ्रमणध्वनीवरून बोलतांना त्यांनी सांगीतले की, "तुर्तास पावसाचा लहरीपणा दिसून येईल.त्यामुळे कोठे चक्क प्रखर ऊन,उष्णताआणि उघाड तर कोठे जोरदार वाऱ्यासह वादळी पाऊस अनुभवायला मिळणार आहे.दि. १२ ते १७ जून पर्यंत महाराष्ट्र राज्याच्या सर्वच प्रांतात आणि जिल्ह्यात दुपारनंतर पाऊस होईल." त्यांच्या म्हणण्या प्रमाणे,दि.१२ ते १७ व पुढे दि.२०, २२,२३,२९ या तारखांना पाऊस होईल. विशेष म्हणजे या तारखांना मुसळधार पाऊस होण्याची शक्यता ग्राह्य धरून हवामान विभागानेही पालघर ठाणे मुंबई पुणे धुळे जळगाव नाशिक सातारा, लातूर वाशिम अमरावती यवतमाळ भंडारा चंद्रपूर वर्धा जिल्ह्यासाठी यलो अलर्टचा इशारा दिला आहे. दरम्यान सद्यस्थितीत अरबी समुद्रा पासून महाराष्ट्रभर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मान्सूनचे वारे वेगाने विदर्भात दाखल होऊन या वादळी पावसामध्येच मान्सूनला गती मिळणार आहे. राज्यात काही ठिकाणी साधारणतः भाग बदलवीत जरी पाऊस पडला तरीही दि.१७ नंतर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ,खान्देश, मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्रासह आपल्या अकोला-वाशिम जिल्ह्यातही पेरणीजोगा पाऊस होऊन,जूनच्या उत्तरार्धात पेरण्यांना सुरुवात होईल.अशी शक्यता दिसत असल्याचे ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी सांगीतले असून,शेतकरी व ग्रामस्थांनी आपल्या शेतात काम करत असतांना हवामान विभागाने दिलेल्या यलो अलर्ट मुळे सतर्क होऊन सायंकाळ पूर्वीच शेतातून घराकडे परत यावे.नदी,नाले,पांदण रस्ते पुरामुळे वहात असतांना कोणीही पुरामधून रस्ता ओलांडू नये. विजा पडणार असल्याने जास्तीत जास्त सतर्क व्हावे. हिरव्या झाडाखाली थांबू नये. गुराढोरांना झाडाखाली बसवू नये. विजेच्या कडकटात पाऊस होत असल्यास मोबाईल फोन बंद ठेवावेत.एकदा भरपूर प्रमाणात चांगला पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नये. असे आवाहन गोपाल पाटील गावंडे यांच्या अंदाजानुसार, ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी केले आहे.