वाशिम.. सामाजिक कार्यकर्ते तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष निलेश पूनमचंद सोमानी यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे 16 जून रोजी पार पडलेले रोप्य महोत्सवी मराठवाडा अधिवेशनात राज्यस्तरावर प्रतिष्ठेचा उत्कृष्ट संघटक पुरस्कार देऊन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते आकर्षक सन्मानचिन्ह सन्मानपत्र शाल श्रीफळ व झाड देऊन सन्मानित करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर येथे संत एकनाथ रंगमंदिर येथे पार पडलेल्या भव्य दिव्य पत्रकारांच्या मराठवाडा अधिवेशनात वरील सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी मंचावर महामंडलेश्वर १००८ श्री शांतिगिरी जी महाराज, राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे, पत्रकार संघाचे प्रदेश संघटक संजय भोकरे प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकोडे, ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे, प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे, राज्य संपर्कप्रमुख वैभव स्वामी, प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव, माजी प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे महाराष्ट्र लघु विकास महामंडळाचे अध्यक्ष जयदीप कवाडे एबीपी माझा संपादक सरिता कौशिक आमदार संजय किनीकर, आमदार प्रदीप जयस्वाल संभाजीनगर मनपा आयुक्त जी श्रीकांत महापौर नंदकुमार घोडेले, समवेत मान्यवर व ज्येष्ठ पत्रकार कलावंत उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते निलेश सोमानी यांना यापूर्वी सुद्धा पत्रकार संघाचे प्रतिष्ठेचे पत्रकार क्षेत्रातील पुरस्काराणे गौरविण्यात आले आहे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे रोप्य महोत्सवी पहिले अधिवेशन मराठवाडा येथे पार पडले असून आगामी ऑगस्ट महिन्यामध्ये विदर्भामध्ये पहिले अधिवेशन तथा राज्यातील दुसरे अधिवेशन वाशीम येथे आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकोडे व प्रदेश कार्याध्यक्ष निलेश सोमानी यांनी सदर अधिवेशनात मान्यवरांच्या उपस्थितीत केली आहे. वाशिम येथे अनेक वर्षानंतर पुन्हा पत्रकार संघाचे अधिवेशन होणार असून सर्व पत्रकार बांधवांनी एकजूट होऊन या अधिवेशनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.