वंचित बहुजन आघाडी तालुका आरमोरीच्या वतीने स्वाभिमानी दिवस म्हणजे श्री बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस हा दिवस उपजिल्हा रुग्णालय आरमोरी येथे रुग्णांना फळ वाटप करून साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा महिला संघटिका प्रज्ञाताई निमगडे, आरमोरी तालुक्याचे अध्यक्ष राजेंद्रजी गेडाम, उपाध्यक्ष विकास भैसारे, गणुजी शेडमाके, सदस्य ताराचंद बनसोड, संध्या रामटेके, किरण रामटेके, नर्मदा मेश्राम, जयश्री रामटेके, व इतर पदाधिकारी उपस्थित होते