मानोरा : मानोरा येथून जवळच शेंदुरजना (अढाव) पासून 8 कि.मी.अंतरावर असलेल्या,पुस नदी किनाऱ्यालगत,निसर्गरम्य वनराईने नटलेल्या,श्रीक्षेत्र रुई येथील डोंगरमाथ्यावर असलेल्या,अतिप्राचिन, ऐतिहासिक व जागृत अशा ( जुन्या हेंबाडपंथी बांधणीच्या) श्री वाघामाय संस्थानला,कारंजा येथील विदर्भ लोककलावंत संघटना तथा जय भवानी जय मल्हार वारकरी मंडळाचे अध्यक्ष, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त संजय कडोळे (पत्रकार) आणि उपाध्यक्ष उमेश अनासाने (पत्रकार) यांनी दर्शनार्थ भेट दिली
असता,श्री वाघामाय संस्थानचे निस्सिम भक्त ह.भ.प. विश्वनाथ पाटील गावंडे यांनी त्यांचे शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सहर्ष स्वागत केले.यावेळी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक गोपाल गावंडे यांची सुद्धा उपस्थिती होती.याप्रसंगी संस्थानची माहिती देतांना,श्री वाघामायचे वयोवृद्ध भाविक भक्त हभप विश्वनाथ पाटील गावंडे यांनी सांगीतले की,या संस्थानचा, श्रीक्षेत्र शिखर शिंगणापूरच्या श्री शंभू महादेव संस्थानशी संबध असून प्रत्यक्ष महादेव पार्वतीने या गावी अवतार धारण करून येथील नंदनवनामध्ये अवतार घेऊन या परिसराला सुजलाम् सुफलाम् करून,आशिर्वादित करून पवित्र केले असल्यामुळे येथे चैत्र,आश्विन नवरात्रोत्सवात आणि पौष महिन्यात फार मोठी यात्रा होत असते.
येथील श्री वाघामाय म्हणजे आदिशक्ती पार्वती असून श्री वाघोबा म्हणजे शिखर शिंगणापूरचे श्री महादेव होत." अशी माहिती त्यांनी दिली.