कारंजा : येथून जवळच असलेल्या,मौजे दूघोरा येथे कारंजा तालुक्यातील मौजे दुघोरा येथील कार्यरत असलेले कृषी सहायक पि बी राऊत कृषी पर्यवेक्षक उदयकर साहेब यांनी गावातील शेतकऱ्यांना,पूर्व सूचना देऊन शेती शाळा व कृषी विषयक सविस्तर माहिती दिली. ज्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाची पेरणी केली त्यांना औषधी व इतर उपकरणे शासनाकडून उपलब्ध करून सरपंच उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत गावातील पात्र शेतकऱ्यांना त्यांचा लाभ दिला. सदर शेती शाळेला गावातील अंदाजे 150 ते 200 शेतकरी हजर होते. या प्रसंगी कृषी पर्यवेक्षक उदयकर साहेब यांनी शेती विषयी बरीचशी माहिती शेतकऱ्यांना दिली. पि बी राऊत कृषी सहाय्यक यांनी उपस्थित शेतकऱ्याचे सहर्ष स्वागत करून आभार मानले. तसेच वेळोवेळी मार्गदर्शनाकरिता किंवा तुम्हाला गरज पडेल तेव्हा वेळ देईल.असे उदयकर साहेब यांनी सांगितले. त्यानंतर सर्व शेतकऱ्यांना चहापाणी फराळ देऊन शेती शाळेची सांगता करण्यात आली. यामध्ये रोजगार सेवक कैलास उगले ,ग्रामपंचायत कर्मचारी मंगेश चाठे यांनी सर्व शेतकऱ्यांना गोळा करून उपस्थित राहण्याकरता सांगितले असे आमचे प्रतिनिधी ब्रह्मानंद बांडे पाटील यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार कळविण्यात येत आहे.